जिल्हा परिषद खेतमाळीसमळा शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात टॅब
श्रीगोंदा, ता. १ : जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा आता हायटेक तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची कास धरू लागल्या आहेत, इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता सकारात्मक होत आहे. दिवसेंदिवस शाळेतील पटसंख्या वाढत आहे. इन्फोसिस कंपनी व जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील तसेच लेखाअधिकारी रमेश कासार यांच्या विशेष प्रयत्नातून मिशन आपुलकी अंतर्गत इन्फोसिस कंपनीतर्फे जिल्हा परिषद खेतमाळीस मळा शाळेस २० टॅब प्राप्त झाले.
या टॅब चे उद्घाटन मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी खेतमाळीसमळा शाळेत गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ विस्तारअधिकारी निळकंठ बोरुडे, भुजबळ साहेब, केंद्रप्रमुख रमेश पाटोळे व नगरसेवक शहाजी खेतमाळीस तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शहाजी शिंदे, उपाध्यक्ष सौ प्रतिभा डाके व सर्व पालकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसुडे, सामाजिक कार्यकर्ते गोरख आळेकर, सचिन पांढरकर, रोहिदास अण्णा सुपेकर,समीर पांढरकर सर, शिवसेना नेते किरण बनसुडे, युवा नेते मयूर बनसुडे,राजू बनसुडे, अंबर अण्णा शिंदे, दीपक खेतमाळीस, संदीप चाकणे, नवनाथ खेतमाळीस, मधुकर गोरखे तसेच शाळेतील सर्व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. या टॅब चां उद्देश पुर्ण करण्यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणारे मुख्याध्यापक शरद तरटे सर व सुधीर तरटे सर यांनी यावेळी सांगितले.शाळेला भौतिक सुविधा मिळवून देणाऱ्या सर्व अधिकारी व पालक यांचे यावेळी त्यांनी आभार मानले.