टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१३ सप्टेंबर : धारकरवाडी ता. श्रीगोंदा येथील आरोपी दत्तू खंडू पारखे यांनी सस्टेनेबल ॲग्रो-कमर्शियल फायनान्स लि.या कंपनीकडून सन २०१६ मध्ये शेतामध्ये विहीर बांधकाम करण्यासाठी रक्कम रु. ४,२१,०००/- चे कर्ज घेतलेले होते. परंतु सदर कर्जाची त्यांनी वेळेत परतफेड केली नाही.
त्यामुळे कंपनीने मागणी केली असता आरोपी दत्तू खंडू पारखे याने रक्कम रु.३,९१,६२५/- चा धनादेश कर्जाच्या रक्कमेच्या परतफेडीसाठी दिला होता. सदरचा धनादेश कंपनीने त्यांचे बँकेमध्ये भरला असता तो न वटता परत आला. त्यामुळे कंपनीने आरोपी दत्तू खंडू पारखे याच्याविरुद्ध अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी श्रीमती टी. एम.निराळे यांचे कोर्टात निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अॅक्ट कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.
सदर फिर्यादीमध्ये कंपनीतर्फे सुशील चहाळ यांचा जबाब व त्यांनी दाखल केलेले कागदपत्र ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीस रक्कम रु. ३,९१,६२५/- दंड करून ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. फिर्यादी कंपनीतर्फे अॅड. तेजस्विनी काकड यांनी काम पहिले.
स्त्रोत:(न्यायालयीन आदेश)