तालुक्यातील विसापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त निवास नाईक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..!
श्रीगोंदा, ता. १ : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आई वडील आपली मुले शिक्षित होऊन त्यांचा उत्कर्ष होईल यासाठी पोटाला चिमटा घेऊन मुलांना सुविधा मिळवून देतात याची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत भविष्य घडवावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष निवास नाईक यांनी तालुक्यातील विसापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यालया मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सोहळ्यात बोलताना केले.
अध्यक्षस्थानी सौ डॉ.प्रणोतीमाई राहुल जगताप होत्या, तसेच प्रमुख अतिथी मुंगुसगाव सरपंच सुजाता संदीप धुमाळ, विसापुर सरपंच रुपाली शिवाजीराव जठार, अंकुशराव रोडे, जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे,प्राचार्य सुनील निकाळजे होते आदी मान्यवर उपस्थित होते.
नाईक म्हणाले पूर्वी च्या काळी शिक्षणासाठी कष्ट घ्यावे लागे आता सर्व सुविधा लीलया मिळतात याचे विद्यार्थ्यांना महत्व नाही आजही विविध स्पर्धा मध्ये प्रशस्ती पत्रक मिळवणाऱ्या यादीत मुलींचा टक्का जास्त आहे मुले मागे पडतात हे चित्र बदलण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतः साठी दररोज २ तास अभ्यासासाठी दिल्यास एमपीएससी यूपीएससी परीक्षेत यश मिळेल यासाठी आमची माजी विद्यार्थी संघटना आणि शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक तुम्हाला मदत करतील.