स्पर्धा परीक्षेत यश मिळालेल्या ८० विद्यार्थ्यांचा अग्निपंख कडून सन्मान..!

अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती

श्रीगोंदा, ता. ६ : श्रीगोंदा येथे अग्नीपंख फौंडेशन आयोजीत प्रेरणा उत्सव २०२४ मध्ये स्पर्धा परीक्षेत बाजी मारणाऱ्या ८० शिलेदारांचा आंब्याचे रोप सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक किरण शिंदे विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे यांचे हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतिशचंद्र सुर्यवंशी होते.

यावेळी अग्नीपंख फौंडेशन वांगदरी विश्वास पारखे या विद्यार्थ्यास पाच हजाराची मदत केली तसेच श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा कौटिल्य अॅकेडमी रनर्स अॅकेडमी सन्मान केला

अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी आई वडीलांचा संघर्ष शिक्षकांविषयी आदर डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला कि यशाची दरवाजे निश्चित खुली होतात मी अग्नीपंख फौंडेशनला २०२१ पासून जोडलो गेलो शाळा विद्यार्थी या साठी हे फौंडेशन आत्मियतेने काम करीत आहेत किरण शिंदे म्हणाले कि भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेऊन काम केले तर निश्चितच यश मिळेल डॉ सतिशचंद्र सुर्यवंशी म्हणाले की अभ्यास करुन यश मिळाले कि आपण यशस्वी झालो असे नाही त्यासाठी माणुस आणि संवेदनाशील मनाने काम करावे लागणार आहे.

यावेळी देवराम रायकर, गौरी ढोकले, यांची भाषणे झाली प्रास्ताविक सैनीक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ खामकर यांनी केले यावेळी प्रशांत गोरे, अकुंश घाडगे, प्रा धर्मनाथ काकडे, प्रा सतिश चोरमले, प्रा. संतोष धुमाळ, प्रा वैभव सोनवणे, गोपाळराव डांगे, विजया लंके, शितल धुमाळ, मनिषा काकडे हजर होते. सुत्रसंचलन विशाल चव्हाण यांनी केले तर आभार नवनाथ दरेकर यांनी मानले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
27.6 ° C
27.6 °
27.6 °
62 %
3.9kmh
66 %
Sat
27 °
Sun
32 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
33 °
error: Content is protected !!