प्रसिद्ध भजन गायक मुकुंद बापू पंडित यांचे वृद्धापकाळाने निधन

भजन क्षेत्रातला एक कोहिनूर हिरा हरपला!

श्रीगोंदा, ता. ८ : तालुक्यातील पेडगाव येथील प्रसिद्ध भजन गायक मुकुंद बापू पंडित यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले ते ८५ वर्षाचे होते मुकुंद पंडित यांना तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तात्या नावाने ओळखले जायचे गेल्या ५ दशकांपासून तात्या हे भजन,गौळण,शास्त्रीय संगीत गायक म्हणून त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली होती

१९८० साली आकाशवाणी पुणे केंद्र यांच्या वतीने मुकुंद बापू पंडित यांना पार्श्वगायक म्हणून सन्मानित करण्यात आले होते तर अनेक वेळा दूरदर्शन वाहिनी वरून अभंग आणि गवळण प्रसारित होत असायच्या श्रीगोंदा तालुक्यातील भजन क्षेत्रातला एक कोहिनूर हिरा हरपला अशी भावना लोक व्यक्त करत आहेत तात्याच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
पेडगाव येथील त्यांच्या मुळ गावी भिमा नदीच्या काठी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
84 %
4.8kmh
100 %
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
30 °
error: Content is protected !!