नागवडे कारखाना दिवाळीपूर्वी सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात ११.७२ कोटी जमा करणार – राजेंद्र नागवडे

सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; खात्यात प्रती मे.टन २०० रुपये प्रमाणे ऊस प्रोत्साहन अनुदान जमा होणार – राजेंद्र नागवडे 

श्रीगोंदा, ता. ९ : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन २०२३ – २४ या गळीत हंगामात गाळप केलेल्या ५ लाख ८५ हजार ४७० मे. टनाकरिता प्रती मे.टन २०० रुपये प्रमाणे ऊस प्रोत्साहन अनुदान म्हणून सुमारे ११ कोटी ७२ लाख रुपये येत्या २० तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.

प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२३ -२४ या गळीत हंगामात पाच लाख ८५ हजार ४७०.५७६ मे टन उसाचे गाळप केले असून सदर उसाच्या संपूर्ण एफ.आर.पी.सह प्रति मे.टन रुपये २७०० याप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा केलेला आहे. गळीत हंगाम सुरू करताना व कारखान्याच्या वार्षिक सभेत जाहीर केल्याप्रमाणे सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता गळीतास आलेल्या उसाचे द्वितीय पेमेंट दोनशे रुपये प्र. मे. टन याप्रमाणे ११ कोटी ७२ लाख रुपये २० ऑक्टोबर चे दरम्यान सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. असे सांगून नागवडे म्हणाले की, मागील गळीत हंगामात कारखान्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषत: ऊसतोड मजूर कमी आल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु यावर्षी अशी अडचण येणार नाही याची दक्षता घेत आहोत.

तसेच प्रतिवर्षीप्रमाणे कारखान्यामार्फत सर्व सभासदांना दिवाळी करिता १० किलो साखर प्रति किलो २० रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील कारखाना साईट, श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी व घारगाव या ठिकाणी दि. १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर पर्यंत साखर वाटप चालू राहणार आहे. या कालावधीत सभासदांनी आपले आधार कार्ड घेऊन संबंधित साखर वाटप केंद्रातून आपली साखर घेऊन जावी असे नागवडे यांनी सांगितले.

स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक अडचणीवर मात करून संचालक मंडळांनी एक विचाराने अत्यंत काटकसरीचा कारभार करून सभासद शेतकऱ्यांच्या शेताला प्राधान्य दिलेले आहे. नागवडे कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना रास्त व शाश्वत ऊस भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे व भविष्यातही करणार आहे. नागवडे कारखान्याच्या विश्वासार्हतेला संचालक मंडळ कधीही बाधा येऊ देणार नाही. येणाऱ्या गळीत हंगामात सुद्धा नागवडे कारखाना ऊस भावात मागे राहणार नाही. म्हणून सभासद शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्यासच ऊस देऊन जास्तीत जास्त गळीत करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व इतर खाते प्रमुख उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
77 %
6.9kmh
100 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!