बिंटूशेठ भुजबळ (चेअरमन), रामदास रसाळ (मेजर) तसेच जनाई प्रतिष्ठान यांच्याकडून विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना नवरात्र निमित्त महाप्रसाद
श्रीगोंदा, ता. ९ : तालुक्यातील शेडगाव येथील भवानी माता मंदिरामध्ये आज दि.९ ऑक्टोबर रोजी नूतन मराठी विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती. मंदिरामध्ये आलेल्या सहलीतील विद्यार्थ्यांसाठी बिंटूशेठ भुजबळ (चेअरमन), रामदास रसाळ (मेजर) तसेच जनाई प्रतिष्ठान यांच्याकडून महाप्रसाद फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्र उत्सवानिमित्त शेडगाव येथील ऐतिहासिक भवानी माता मंदिर येथे नऊ दिवस मोठा उत्सव सुरू असतो त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बिंटूशेठ भुजबळ (चेअरमन) व रामदास रसाळ (मेजर) तसेच जनाई प्रतिष्ठान तर्फे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक हे उपस्थित होते यावेळी विध्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे उद्योजक सोमनाथ धेंडे यांनी आभार मानले.