नागवडे कारखाना प्रकल्प; प्रेसमड पासून सी.बी.जी. गॅस प्रकल्पाचे भूमिपूजन

स्पेंट वॉश पासून सी.बी.जी. गॅस प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांची माहिती

श्रीगोंदा, ता. १० : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने बी.ओ.टी. तत्त्वावर (बांधा वापरा व हस्तांतरित करा) प्रेसमड व स्पेंट वॉश पासून सी.बी.जी. गॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून भविष्य काळा सदरचा प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व मे. राज प्रोसेस इक्विपमेंट अँड सिस्टीम प्रा.ली. पुणे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सदरचा प्रकल्प बी. ओ. टी. तत्त्वावर उभारण्यात येणार असून सोमवार ता. ७ रोजी सदर प्रकल्पाचे भूमिपूजन कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले. यावेळी नागवडे बोलताना म्हणाले की, कारखान्यामध्ये प्रतिवर्षीजी प्रेसमड व स्पेंटवाश तयार होतो त्यापासून सी.बी.जी गॅस तयार करण्यात येणार आहे. राज प्रोसेस ही कंपनी पूर्णतः स्वखर्चाने सदरचा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी कारखान्यात निर्माण होणारे प्रेसमड व स्पेंटवॉशचा पुरवठा कारखाना त्यांना करणार आहे . बायोगॅस निर्मिती हा शाश्वत व पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत आहे त्यामुळे पर्यावरण व अर्थव्यवस्था व समाज या तीनही घटकांवर सकारात्मक परिणाम होणार असल्यामुळे राज्य व केंद्र शासनाने या प्रकल्पास प्रोत्साहन देण्याचे धोरण घेतलेले आहे. हा प्रकल्प उभा करण्याकरिता कारखाना कंपनीस फक्त जागा उपलब्ध करून देणार असून सदर जागेचे भाडे प्रति वर्ष प्रति एकर एक लाख रुपये याप्रमाणे कारखान्यास मिळणार आहे. सदरचा करार हा पंधरा वर्षाकरिता करण्यात येणार आहे. पंधरा वर्षानंतर सदरचा प्रकल्प आहे त्या स्थितीत कारखान्याकडे हस्तांतरित करण्यात येणार असून कारखान्याच्या मालकीचा होणार आहे. सदर प्रकल्पाकरिता कारखाना ७०० रुपये प्र.मे.टन या दराने कंपनीस प्रेसमड विकणार आहे. स्पेंट वॉश पासून तयार होणाऱ्या सीबीसी गॅसचे प्रति किलो २० रुपये प्रमाणे उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे. त्यामुळे कारखान्यास प्रेसमड व स्पेंट वॉशची विल्हेवाट लावण्याच्या खर्चात बचत होणारा असून उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होणार आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार असल्याने उद्याच्या स्पर्धेच्या काळात शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देणे कारखान्यास शक्य होणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

संचालक लक्ष्मणराव रायकर व मारुती मामा पाचपुते यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व सर्व संचालक मंडळ सदस्य, राज प्रोसेस कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिलराज पिसे, मार्केटिंग व्हाईस चेअरमन विन पनीकर, व्हाईस प्रोजेक्ट प्रेसिडेंट रईस मुल्ला, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, चीफ इंजिनियर डी.एम. तावरे, प्रोडक्शन मॅनेजर एन.एम.कळमकर , चीफ अकाउंटंट सतिश जांभळे यांच्यासह इतर अधिकारी व कामगार उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
77 %
6.9kmh
100 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!