शिव भवानी अन्नछत्र व सर्व तरुण मंडळे घोडेगाव यांनी लोकवर्गणीतून अन्नछत्राचा हा उपक्रम नऊ दिवस यशस्वीरित्या राबवला आहे
श्रीगोंदा, ता. ११ : तालुक्यातील घोडेगाव येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. शिव भवानी अन्नछत्र व सर्व तरुण मंडळे घोडेगाव यांच्या कडून नवरात्र निमित्त पंचक्रोशीतील ग्रामस्थांना तसेच देवी भक्तांना लोकसहभागातुन नऊ दिवस उपवास फराळ अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम दि.३ ऑक्टोबर घटस्थापनेपासून सुरु झाला असून दसऱ्यापर्यंत अन्नछत्र सुरू असते.
मागील तीन वर्षापासून घोडेगाव येथील तरुणांनी लोकवर्गणीतून अन्नछत्राचा हा उपक्रम राबवला आहे या ठिकाणी तुळजाभवानी माता व तुकाईमाता यांचे भव्य मंदिर आहे नऊ दिवस मोठा कार्यक्रम चालतो येणारे भाविक भक्त तसेच गावातील दानशूर व्यक्ती या ठिकाणी स्वइच्छेने वर्गणी स्वरूपात मोठी देणगी देतात.
या कार्यक्रमासाठी शिव भवानी अन्नछत्र तरुण मंडळ तसेच घोडेगाव येथील सर्व तरुण मंडळातील तरुणांनी चांगला सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या राबवला आहे त्यांचे गावातील ग्रामस्थांकडून तसेच पंचक्रोशीतील सर्वांकडूनच कौतुक होत आहे