भाजप कडून उमेदवारी साठी मीच प्रबळ दावेदार; पक्ष आपली निष्ठा आणि काम पाहून न्याय देईल – सुवर्णा पाचपुते

भाजप घराणेशाहीला मानणारा पक्ष नाही त्यामुळे मला उमेदवारी संदर्भात भाजपकडून पूर्ण विश्वास – सुवर्णा पाचपुते

श्रीगोंदा, ता. १५ : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघा मधील उमेदवारी संदर्भात भाजपच्या सुवर्णा पाचपुते यांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी काष्टी येथील त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला, भाजप पक्षाकडून मी प्रबळ दावेदार असून मलाच पक्षाकडून तिकीट मिळणार आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

मागील तीन महिन्यापासून संपूर्ण तालुका फिरून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जनता खूप त्रस्त आहे पारंपारिक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत त्यासाठी मी उमेदवारी करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे. आता सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण मी थांबणार नाही असेही त्या म्हणाल्या वीस वर्षापासून मी भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहे भाजप घराणेशाहीला मानणारा पक्ष नाही त्यामुळे मला उमेदवारी संदर्भात भाजपकडून पूर्ण विश्वास आहे २०१४ साली भाजपचे चांगले वातावरण असतानाही भाजपचा उमेदवार पराभूत झाला त्यामुळे यावेळी उमेदवार निवडून आणायचा असेल तर पक्षाला मलाच उमेदवारी द्यावी लागेल.

भाजप ला प्रतिकूल, अनुकूल परिस्थितीतही साथ देणाऱ्या सौ. सुवर्णा पाचपुते यांनी अडीच महिन्या पूर्वी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात फिक्स उमेदवार म्हणून फ्लेक्स लाऊन मतदार संघात दौरा केल्याने त्या प्रकाश झोतात आल्या गेल्या अडीच महिन्यात मतदार संघात फिरताना मिळालेला प्रतिसाद, मूलभूत प्रश्न मार्गी न लागल्याने लोकांचा सत्ताधाऱ्यां वरील रोष यातून आपण विजयी होऊ अशी आशा असल्याचे सांगून सौ. पाचपुते यांनी गेल्या १० वर्षात आपणावर पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडली पण पक्षाने २०१४, २०१९ मध्ये उमेदवारी दिली नाही बदल्यात जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला तोही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पाळला नाही असा आरोप त्यांनी केला.

२०१४ मध्ये भाजप ने कामाला लागा असा आदेश दिला पण पक्षात नव्या नेतृत्वाच्या प्रवेशाने उमेदवारी रद्द झाली पण आपण पक्ष वाढीसाठी काम केले विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या साठी प्रचार केला काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रताप पाचपुते यांचा प्रचार केला ,सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी सौ . प्रतिभा पाचपुते यांचा प्रचार केला, लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा प्रचार केला त्यामूळे पक्ष नक्की दखल घेईल लोकांची मागणी काय आहे याचा आदर पक्ष करेल असे सांगून सौ. पाचपुते यांनी पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी कारण भाजप घराणे शाही चा पुरस्कार करणारा पक्ष नाही.

मतदार संघातील फ्लेक्स,दौरा,सुख दुःख,लग्न सोहळे,सामाजिक कार्यक्रमात सहभाग यासाठी रसद पुरवली जाते का? अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी विचारता सौ.पाचपुते म्हणाल्या माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही,संस्था नाही माझा सर्व खर्च वडील शिवाजीराव नांद्रे हे आपल्या शेतातील उत्पादन विकून करत आहेत असे स्पष्ट करून आम्ही कोणाच्या प्रलोभनाला बळी पडणारे नसून आम्हाला पैशाने कोणी खरेदी करू शकत नाही आम्ही कोणाच्या आदेशाने उमेदवारी करत नसून कोणाच्या आदेशाने माघार देखील घेणार नाही सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दररोज लोकांच्या प्रश्नात असून मतदार संघात कुकडी,घोड आवर्तन, डिंभे – माणिकडोह बोगदा, साकळाई उपसा जलसिंचन प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालय,कृषि महा विद्यालय हे पारंपरिक प्रश्न राजकीय अनास्थे मुळे सुटू शकले नाही ही या मतदार संघाची शोकांतिका असून हे चित्र बदलण्यासाठी माझी उमेदवारी करणार असून मतदारांनी आज पर्यंत अनेकांना संधी दिली पण प्रश्न जैसे थे राहिल्याने मतदारांनीच मला दौऱ्या दरम्यान या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असून उमेदवारी करणारच याचा पुनरुच्चार करून मतदार संघात कोणत्याही आघाडी चे वातावरण नसून लोकच आता बदलाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सर्वात कमी खर्चात आपण विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

चौकट
भाजप उमेदवारी देईल का असे विचारता सौ.सुवर्णाताई पाचपुते म्हणाल्या मी पक्ष बदलला नाही आणि २० वर्षात पक्षाचे ध्येय धोरणे राबवले,पक्ष वाढवला स्वर्गीय दिलीप गांधी, अभय आगरकर, माजी खा.सुजय विखे,आ.बबनराव पाचपुते, माजी मंत्री आ.राम शिंदे,स्व.सदाशिव पाचपुते,शिरूरचे बाबुराव पाचर्णे आदींचा प्रचार केला २०१४ आणि २०१९ मध्ये उमेदवारी साठी मुलाखत दिली पक्ष आपली निष्ठा आणि काम पाहून न्याय देईल – सौ. सुवर्णा पाचपुते
भाजप नेत्या,श्रीगोंदा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!