राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपली उमेदवारी निश्चित – राहुल जगताप
श्रीगोंदा, ता. १५ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राहुल जगताप यांनी पिंपळगाव पिसा येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपली उमेदवारी निश्चित आहे असं जगताप यांनी सांगितले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन केशव मगर हे होते
सध्या तालुक्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजी करणारे अनेक जण आहेत त्यावर बोलताना ते म्हणाले परीक्षेच्या तोंडावर पुस्तका उघडणारे अशी त्यांची तुलना होऊ शकते आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत आणि आमचा परीक्षेचा अभ्यासही पूर्ण आहे असे जगताप यांनी सांगितले.
राहुल जगताप बोलताना म्हणाले तात्यांची मला शिकवण आहे संघर्ष करा पण तडजोड करू नका, कितीही त्रास झाला तरी बबनदादांचा मी कधी प्रचार केला नाही. प्रकल्पांची उंची वाढवताना यांनी स्वतःची उंची इतकी वाढवली की त्यांना बसलेली जनता दिसेना. चार हजार किमी चे रस्ते मंजूर करून आणले असे ते सांगतात प्रत्यक्षात विचार केला तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रस्त्यांची लांबी साडेतीन हजार किलोमीटर होते त्यामुळे त्यांनी फक्त पोकळ आश्वासने देण्याचे काम आजपर्यंत केले. जसजशी निवडणूक जवळ येईल तस तसा मी ठणठणीत आहे असे ते सांगत आहेत अशी टीका ही जगताप यांनी पाचपुते यांचे नाव न घेता केली.
यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी हरिदास शिर्के, राजू पाटील,दिपक भोसले, उत्तम डाके, टिळक भोस कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजू पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अतुल लोखंडे यांनी केले.