देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करताना सुझुकी कंपनीची कॅरी गाडीसह आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात
श्रीगोंदा, ता. १६ : श्रीगोंदा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून कारवाई केली व विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460/- रुपयांचा मुददेमाल जप्त करत श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, विवेकानंद वाखारे विभाग व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर एक सुझुकी कंपनीची कॅरी गाडीत एक अनोळखी व्यक्ती हा देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो.नि किरण शिंदे , यांनी ताबडतोब गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोना/गोकुळ इंगावले, पोकों/संदिप राऊत, पोकों/संदिप शिरसाठ व पोकों/आनंद मैड यांना सदरची बातमी सांगून कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितले.
सविस्तर माहिती अशी की पोना/गोकुळ इंगावले यांनी दोन खाजगी पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावून सदरची माहिती सांगून कारवाई करणेकामी सोबत येण्यास कळविल्याने खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर हॉटेल यशोदा समोरील रोडवर सापळा रचुन विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारुची विक्री करणारा व्यक्ती शैलेंद्र सुखदेव बोरगे वय-52 वर्षे रा. सोनेवाडी ता.जि. अहिल्यानगर यास सुझुकी कंपनीची कॅरी गाडीसह ताब्यात घेवून त्याचेकडून 5,00,000/-रुपये किमंतीची सुझुकी कंपनीची कॅरी व 2,75,460/-रुपये किमंतीची देशी-विदेशी दारु असा एकुण 7,75,460/-रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाबत पोकों/314 संदिप शिरसाठ यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीगोंदा पो.स्टे गु.रजि.नं- 0910/2024 मु. दारुबंदी का.क.65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना/295 गोकुळ इंगावले हे करीत आहे