श्रीगोंदा मतदार संघामध्ये विधानसभेसाठी नागवडे विरुद्ध पाचपुते अशी लढत होणार..!
मुंबई, ता. २३ : अनुराधा नागवडे यांचा मुंबई येथे ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार संजय राऊत, राजेंद्र नागवडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला आणि महाविकास आघाडी कडून श्रीगोंद्यासाठी उमेदवारी जाहीर झाली. श्रीगोंदा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून असलेला काहीसा पेच आता संपुष्टात आला असून आता जुने प्रतिस्पर्धी नागवडे विरुद्ध पाचपुते आमने-सामने लढणार.
अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे करून साजन पाचपुते यांनी एनवेळी माघार घेत तालुक्यातील राजकारणात त्याचे दिवंगत वडील सदाशिव पाचपुते यांची किंगमेकर भूमिका बजावल्याने राजकीय परिपक्कवता यातून दिसून आली. याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होताना दिसत आहे.
काही दिवसांपासून ठाकरे गटात इन्कामिंग जोरात सुरु आहे असं सांगताना उद्धव ठाकरेंनी सांगितले घरी बसून जर जनता माझ्या दारात येत असेल तर मी भाग्यवान आहे पूर्वी शिवसेना संकटात होती त्याच्या कित्येक पटीने आता ती मोठी झाली. एकदा श्रीगोंदा हा मतदार संघ जिंकला की पुढील पंचवीस – पन्नास वर्ष ही जागा आपलीच असं साजन पाचपुते यांचे म्हणने उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडले विजय आजच नक्की पण गाफिल राहू नका असा सल्ला त्यांनी दिला. शिवसेनेचे साजनची जबाबदारी जशी माझी आहे तशी आपली सर्वांची आहे हेही त्यांनी नमूद केले. माशाली सारखे धगधगते राहीलात तर अंधःकार आपल्या जवळही राहणार नाही जागे राहा धगधगती मशाल घरा घरात पोहचवा हीच मशाल घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना जाळून टाका असंही ते म्हणाले.
श्रीगोंद्याची सीट मोठ्या मताधिक्याने आणू साजन पाचपुते यांनी त्याची जागा सोडली त्यांचे आभार व्यक्त करत जिल्ह्यात शिवसेना वाढवनार असल्याचे अनुराधा नागावडे यांनी सांगितले.
यावेळी श्रीगोंद्यातुन अनेक प्रमुख कार्यकर्ते मातोश्री निवास्थानी उपस्थित होते त्यामध्ये दिपक शेठ नागवडे, साजन पाचपुते, सुभाष काका शिंदे, आदेश नागवडे, योगेश नागवडे,बाळासाहेब दुतारे, विजय शेंडे, प्रशांत गोरे, समीर बोरा, सतीश मखरे, सुधीर जामदार, गणेश धांडे, महेश तावरे, योगेश भोईटे, चांगदेव पाचपुते, अजीज शेख,सुनंदाताई पाचपुते, सुरेखा लकडे, माधुरी नागवडे, उषाताई नागवडे यांच्या सहा अनेक ग्रामपंचायत सरपंच कारखाना संचालक तसेच नगरसेवक विविध सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.