टीम लोकक्रांती : आढळगाव प्रतिनिधी दि.१५ सप्टेंबर २०२२ : गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी आढळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास निधी अंर्गत २७.५ लाख रुपये विकास कामांसाठी मंजूर झाले असून त्या कामांचा भूमिपूजन समारंभ आढळगाव ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद उबाळे, उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्या हस्ते पार पडला.
- या निधी च्या माध्यमातून आढळगाव दशक्रियाविधी परिसरात काँक्रीटीकरण रस्ता, नविन ओटे ओटे दुरुस्ती (४ लाख रुपये), दशक्रिया विधी संपूर्ण परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे(७ लाख रुपये), तांदळी- आढळगाव रोड ते दशक्रिया विधी परिसर काँक्रिटीकरण करणे(१४.५०लाख रुपये), तसेच मातंगवस्ती मध्ये परिसरात गटारलाईन करणे (२ लाख रुपये) या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, आढळगावचे तरुण नेतृत्व शरद जमदाडे तसेच सोसायटीचे माजी चेअरमन गदादे, सत्यवान शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, जालिंदर बोडखे, अविनाश मिसाळ, मनोहर शिंदे, नितीन गव्हाणे, सुनील बोळगे, माजी सरपंच नानाभाऊ बोळगे, जिजाराम डोके, मधुकर गिरमकर, कॉन्ट्रॅक्टर झणझणे इत्यादी मान्यवर आणि जनसमुदाय उपस्थित होता.
स्त्रोत:(पत्रकार सचिन शिंदे)