श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अनेक मातब्बर रिंगणात असुन सुवर्णा पाचपुते यांनी आव्हान उभे केले आहे
श्रीगोंदा, ता. २५ : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी सुवर्णा पाचपुते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असुन अनेक ठिकाणी उमेदवारांची नावे निश्चित झाली असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुरुवार दि. २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा निवडणुक अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी गौरी सावंत, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी स्विकारला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले कि, गेली अनेक वर्षे सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करत असुन पक्षाकडुन उमेदवारी मिळेल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. मी उमेदवारी अर्ज दाखल केला असुन जनता आमच्या संघर्षात सोबत आहे असे त्यांनी बोलताना त्यांनी सांगितले.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अनेक मातब्बर रिंगणात असुन सुवर्णा पाचपुते यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभेची निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.