ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस व शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुराधा नागवडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला
श्रीगोंदा, ता. २८ : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेना उपनेते साजन पाचपुते व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा-नगर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांच्याकडे दाखल करण्यात आला. या प्रसंगी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २२६ श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातून सौ. अनुराधा नागवडे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली त्यामुळे श्रीगोंद्यातील शिवसैनिक यांच्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघासाठी आज हजारोंच्या साक्षीने अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गावोगावीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी तुडुंब झालेली गर्दी, घोषणा, शिट्ट्या आणि मशालीचा विजय असो, हा निनाद त्यामुळे सर्व वातावरणच ‘मशाल’मय झाले होते. ढोल ताशांच्या गजरात जोधपूर मारुती चौक ते शनीचौक मार्गावर मोठी रॅली यावेळी काढण्यात आली.
यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते, शिवसेना उपनेते साजनभैय्या पाचपुते, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, सुनंदाताई पाचपुते, सुनिता शिंदे, दिपक नागवडे,आदेश नागवडे आदी मान्यवर उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला त्या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.