सहकारी संस्था व शेतकरी हित जोपासताना समाजाच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्यात भगवानराव पाचपुते यशस्वी! – ज्येष्टनेते भास्करराव जगताप

टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी दि.१५ सप्टेंबर २०२२ :
बुधवार दि.१४ सप्टेंबर रोजी नागवडे सहकारी साखर कारखाना माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांचे वाढदिवसानिमित्त निवासस्थानी छोटेखानी अभिष्टचिंतन सोहळा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भास्करराव जगताप होते. भगवानराव पाचपुते व सौ.रत्नमाला पाचपुते या दाम्पत्याचा केशवभाऊ मगर, लक्ष्मणराव नलगे,बाळासाहेब गिरमकर,दीपक भोसले व वैभवदादा पाचपुते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

श्रीगोंदा साखर कारखाना, सेवा सोसायटी,दूध डेअरी व पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थेत भगवानराव पाचपुते यांनी पारदर्शक कारभार आर्थिक शिस्त पाळताना सहकारी संस्था व सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले भगवानराव यांनी नेतेमंङळीचे मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेवून काम केले.सहकारी चळवळीचे माध्यमातून संस्था व शेतकरी हिताला केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक समाजाचा विकास साधण्यात भगवानराव पाचपुते यशस्वी झाले आहेत.असे प्रतिपादन ज्येष्टनेते भास्करराव जगताप यांनी केले.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार करताना ज्येष्टनेते भास्करराव जगताप,मोहनराव भोसले पाटील,आधिकराव चव्हाण, अॅड. प्रतापबापू पाचपुते यांची प्रमुख उपस्थित होती.

या छोट्याशा कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अमोल पवार,मोहन भोसले,गोरख कोकाटे,सतिश कुतवळ,मुख्याध्यापक सुनिल गिरमकर सर,संतोष पाचपुते,नवनाथ पाचपुते आदिंसह मान्यवर उपस्थित होते

प्रास्ताविक आधिकराव चव्हाण यांनी केले. संभाजीराव कोकाटे व राहूल साळवे यांनी सुत्रसंचालन केले.अॅड.प्रतापबापू पाचपुते यांनी आभार मानले.
स्त्रोत:(पत्रकार कुरुमकर)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!