जरांगे पाटील यांच्या आदेशाने श्रीगोंदा-नगर विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा निवास नाईक यांनी केला
श्रीगोंदा, ता. २९ : २२६ श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना माजी उपाध्यक्ष निवास नाईक यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडी कडून ते इच्छुक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात घेतलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी मुलाखत दिली होती. जागा वाटपात शिवसेनेला जागा सुटल्याने नाईक यांनी २४ ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षण लढाई चे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती जरांगे पाटील यांनी निवास नाईक यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले त्यानुसार नाईक यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला अशी माहिती निवास नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२२६- श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित सिने अभिनेते विजय नवले, चांभुर्डी येथील चेअरमन बाबुराव ढगे, दानेश सय्यद, जितेंद्र पाडळे, माझी सरपंच संपत उदार, उप सरपंच संतोष ढगे, बन्सी आढाव, श्रीधर नाईक, जयसिंग वाळके सर, संकेत ढगे, दत्तात्रय नाईक आदी उपस्थित होते.
मतदार संघात ग्रामीण भागात विकासाचा अनुशेष, भरून काढणे साठी एमआयडीसी, साकळाई योजना, डिंबे माणिकडोह बोगदा, विसापुर तलावा शेजारील आणि खालील शेतकऱ्यांना पाणी देनेसाठी सामान न्याय देणे, ग्रामीण रुग्णालया मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे असे अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.