शक्ती प्रदर्शन करत राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला; फ्लेक्सवर झळकले पवार साहेबांचे फोटो

आता माझ्या उमेदवारी चा निर्णय मुंबईतुन नाही होणार तो श्रीगोंद्यातील सामान्य जनतेतून होईल – राहुल जगताप

श्रीगोंदा, ता. २९ : श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघामध्ये राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भैरवनाथ मंदिरापासून रॅलीला सुरुवात करून शेख महंमद महाराज पटांगणामध्ये सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय एकवटला होता,मोठे शक्ती प्रदर्शन करत राहूल जगताप यांनी निवडणुकीचे रणसिंग फुंकले तसेच सभेत प्रचाराचा नारळ ही फोडला.

सभेत बोलताना राहुल जगताप म्हणाले माझा उमेदवारी अर्ज सामान्य जनतेने भरला आहे आता माझ्या उमेदवारी चा निर्णय मुंबईतुन नाही होणार तो श्रीगोंद्यातील सामान्य जनतेतून होईल असं सूचक वक्तव्य त्यांनी केले. तडजोड माझ्या कडे होत नाही निर्णय आता तुमच्या हातात आहे निवडणुकीतून आता माघार घेणार नाही ही निवडणूक आता सामान्य जनतेची झाली आहे. विरोधकांनी
लोक गोळा करण्यासाठी लाभ दिला स्टेटस ठेवायलाही वेगळा लाभ अशी टिका त्यांनी केली. उमेदवारी करू का असं विचारलं असता जनतेने हात वर करून उभे राहायचे का नाही या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले. त्याचवेळी जनतेला माझे कवच व्हावे लागेल असं ही ते म्हणाले.

जर आता उमेदवारी मागे घ्या असं कोणी म्हणाले तर कोणत्याही वरिष्ठांचा फोन उचलणार नाही या आधी सुद्धा तडजोडीच्या राजकारणात माझा यांनी बळी घेतला आता पुन्हा असं होऊ देणार नाही. समोरील दोन्ही महिला उमेदवार आहेत त्यांच्यावर कसलीही टिका करायची नाही असेही जगताप यांनी नमूद केले.यावेळी केशवभाऊ मगर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

सभेचे अध्यक्षस्थानी केशवभाऊ मगर होते यावेळी सूत्रसंचालन अतुल लोखंडे यांनी केले मनोगते सागर बोरुडे,सकलेन शेख, अतुल लोखंडे, दिपक भोसले,रंगनाथ निमसे, हरिदास शिर्के आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25.9 ° C
25.9 °
25.9 °
66 %
10.1kmh
99 %
Mon
26 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
30 °
error: Content is protected !!