विधानसभेत हक्काचे आमदार म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यावेत निश्चितपणे तालुका वैभवशाली करू – अनुराधा नागवडे

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या निमगाव खलू येथील जन आशीर्वाद यात्रेस उदंड प्रतिसाद

श्रीगोंदा, ता. ३१ : श्रीगोंदा-नगर मतदार संघात आयोजित जन-आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांनी मौजे निमगांव खलू येथे भेट दिली तसेच उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. सोबत स्थानिक समस्या व अडचणी समजून घेतल्या.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना सौ नागवडे पुढे म्हणाल्या की; येणारी विधानसभा निवडणूक ही आपल्या मतदारसंघाचे भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापाला बळी न पडता आपल्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या मतदारसंघाचे भविष्य सुरक्षित करूया आणि विकासाला चालना देऊया, असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले. श्रीगोंदा तालुक्यात विद्यमान लोकप्रतिनिधींनी सत्तेतून स्वतःची संपत्ती मिळवली प्रत्येक विधानसभा निवडणुकीत एमआयडीसीची घोषणा करून प्रत्यक्षात मात्र कुठलेही विकासाचे भरीव काम झालेले नाही. फक्त मते मिळवण्यासाठी तरुणांना आमिश दाखवले जाते प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होत नाही अनेक तरुण बेरोजगार आहेत चाळीस वर्षात एकही विकासाचे भरीव काम लोकप्रतिनिधींकडून झालेले नाही.

तालुक्याची कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असून सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही त्यामध्ये अनेक मुलींचे अपहरण होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील अतिशय गंभीर बनला आहे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी विधानसभेत हक्काचे आमदार म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यावेत निश्चितपणे तालुका वैभव शाली करू असे आश्वासन अनुराधाताई नागवडे यांनी निमगाव खलू येथील ग्रामस्थांना दिले.

यावेळी विठ्ठल तात्या बोत्रे, रमेश नाना जाधव, युवराज अण्णा चितळकर, रामदास झेंडे, संतोष बारगळ, वाल्मिकी कातोरे, बाळासाहेब बोत्रे, सुदेश बारगळ, मोहनराव जाधव, सतीश बारगळ, संजय चितळकर, माधुरी नागवडे, शितलताई रंधवे, ज्ञानदेव जाधव, रमेश रुपनर, सुरेश ढगे, कल्याण गुणवरे, भाऊसाहेब शेवाळे, पोपट बोत्रे, क्रांतीलाल गुणवरे, ज्ञानदेव जाधव, मारुती शिंदे, अशोक कोळसे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!