विधानसभा निवडणुकीत सौ.अनुराधाताई नागवडे ह्या मताधिक्यांचा उच्यांक गाठणार; तालुक्यातील मविआच्या नेत्यांना ठाम विश्वास!

नगर श्रीगोंदा मतदारसंघातील सर्वेत सौ नागवडेंना प्रथम क्रमांकाची पसंती

श्रीगोंदा, ता. १ : अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व मातब्बर घराणे म्हणून संबोधले जाणारे नागवडे कुटुंबाने सत्ता नसतानाही श्रीगोंदा तालुका सर्व क्षेत्रात विकासाच्या पर्वावर पोहोचविला. त्यामुळे नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई नागवडे ह्या विक्रमी मतांचे रेकॉर्ड करणार असल्याच्या भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

प्रामुख्याने श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी आपले राजकारणाबरोबरच समाजकारणात भरीव योगदान देत असताना सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला मोठे वैभव मिळून दिले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी ढोकराईच्या माळरानावर बेलवंडी येथील खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला आणि खऱ्या अर्थाने तेथूनच पुढे श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाला मोठी गती आली. या दुष्काळी तालुक्याला योगदान देत असताना सहकार महर्षी बापूंनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. परंतु माझ्या तालुक्यातला कष्टकरी शेतकरी सुखी झाला पाहिजे त्याच्या शेतीला पाठ पाण्याची सोय व्हावी म्हणून सहकार महर्षी बापूंनी प्रथम विशाल कुकडी परिषदेचा लढा उभारून या दुष्काळी तालुक्याला कुकडीचे पाणी मिळवून दिले. आजही कष्टकरी शेतकरी हे कुकडीच्या पाट पाण्यासाठी बापूंच्या संघर्षाची आठवण करून देतात. सहकार महर्षी बापूंचीच कृपादृष्टी असल्याचे आवर्जून सांगतात. शिवाय तालुक्याची सत्ता नसतानाही नागवडे कुटुंबाने समाजाच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष केला. या कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नानंतर तालुक्यात घोड धरणाचे पाणी देखील बापूंच्या संघर्षातूनच शेतकऱ्यांना मिळाले. हे कोणीही नाकारू शकत नाही.

सहकार महर्षी बापूंनी तालुक्यात सहकार सिंचन शिक्षण आणि कृषी क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आणि तोच वारसा बापूंचे पुत्र नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे; दीपक शेठ नागवडे हे सक्षमपणे पुढे चालवत आहेत. त्यामुळे ज्या नागवडे कुटुंबाने या दुष्काळी तालुक्याला सर्वच क्षेत्रात वैभव मिळून दिले मग नागवडे कुटुंबातील आमदार का होऊ नये? तालुक्यातील प्रत्येक वेळी अस्मानी संकटात नागवडे कुटुंबच सर्वसामान्यांच्या सुखदुःखात अग्रभागी असते. काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार इतर नेते मात्र संकटप्रसंगी सर्वसामान्यांकडे पाठ फिरवतात निवडणूक आली की तेच नेते व कार्यकर्ते मते मागतात. त्यांना मते मागण्याचा देखील नैतिक अधिकार नाही असा सवाल देखील पत्रकारांशी बोलताना कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले आहे.

आता इतर जे उमेदवार आहेत त्यांना मात्र कोरोना काळ, पाठ पाण्याचा प्रश्न सर्वसामान्यांचा संकट काळ आठवत नाही हे देखील मोठी शोकांतिका आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा काळ हा संपूर्ण जगाला तीव्र दुःख देऊन गेला. त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील देखील अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्तींना या कोरोनाने बळी घेतले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र या काळात कुठेच फिरताना दिसले नाही. मात्र नागवडे कुटुंबातील राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे यांनी श्रीगोंद्यात भव्य असे कोरोना सेंटर उभारून गरजू पीडित रुग्णांना उपचार मिळवून दिले. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. हे आपण जाणून घेतले पाहिजे. अशा भावना देखील तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

एवढ्यावरच हे नागवडे कुटुंब थांबले नाही तर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला कोरोनाच्या काळामध्ये दहा हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. इतर उमेदवार व नेत्यांना काबर आठवले नाही. हे देखील जनतेने जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे नागवडे कुटुंबाचे तालुक्यात सर्व क्षेत्रात भरीव योगदान असताना आता तालुक्यातील तमाम जनतेने देखील या नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे. विधानसभेला सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या सुनबाई सौ अनुराधाताई नागवडे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभ्या आहेत. सौ नागवडे यांनी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी बचत गटामार्फत मोठे आर्थिक पाठबळ देखील दिलेले आहे त्यामुळे महिला वर्गांचा देखील अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सहकार महर्षी बापूंचा वारसा खंबीरपणे चालवत असताना सर्वसामान्यांना अधिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. या नागवडे परिवाराने बापूंच्या विकासाची संकल्पना पुढे नेत खंबीरपणे वारसा पुढे चालवला आहे. त्यामध्ये सौ.अनुराधाताई नागवडे या अग्रक्रमाने पुढे आहेत. नगर -श्रीगोंदा मतदार संघात प्रत्येक खेडोपाडी जाऊन अनुराधाताई नागवडे व त्यांच्या परिवाराने सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये अनेक समस्या सोडवल्या. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये नागवडे कुटुंबांविषयी मोठा आदर व विश्वास या मतदारसंघात निर्माण झाल्याच्या भावना देखील सर्वसामान्यांमधून व्यक्त होताना दिसत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सहकार महर्षी बापूंनी स्वतःला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळत असताना देखील बापूंनी ती नाकारली आणि राहुल जगताप यांच्यासाठी बापूंनी शिफारस केली. त्यावेळी याच नागवडे परिवाराने संपूर्ण श्रीगोंदा तालुका राहुल जगताप यांना निवडून द्या; यासाठी अहोरात्र कष्ट घेतले.

आज मात्र हे चित्र तालुक्यात वेगळे होताना दिसत आहे. राहुल जगताप यांनी पाठीमागे दहा वर्षाचा इतिहास तपासून नागवडे यांना आगामी २०२४ च्या निवडणुकीत पाठिंबा देऊन परत फेड करण्याची आवश्यकता आहे. असा सूर देखील संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे. परंतु श्रीगोंदा तालुक्यातील विकासात नागवडे कुटुंबाचे असलेले योगदान तालुक्यातील जनता कदापिही विसरणार नाही. अशा प्रतिक्रिया देखील सर्वसामान्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. नागवडे कुटुंबातील सौ अनुराधाताई नागवडे या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तालुक्यातील मतदारांचा निवडणूक सर्वे देखील समोर आला आहे. त्यामध्ये अनुराधाताई नागवडे यांना प्रथम क्रमांकाची पसंती असल्याचा कौल मिळाला आहे. त्यामुळे निवडणूक सर्वे म्हणजे एक नागवडे कुटुंबाचा तालुक्यातील विकासाचा व सर्वसामान्यांच्या हिताचा पर्वकाळ ठरणार आहे. तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांमधून देखील अनुराधाताई नागवडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे वाढेल; यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तालुक्याचा विकास हवा तर आमदार नवा अशा भावना निर्माण करताना दिसत आहेत. त्यामध्ये सौ अनुराधाताई नागवडे यांच्या जन आशीर्वाद यात्रेस देखील तालुक्यातील नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जनतेने उदंड असा प्रतिसाद नागवडे कुटुंबावर व्यक्त केला असल्याचे या जन आशीर्वाद यात्रेवरून दिसून येत आहे. या नागवडे कुटुंबाच्या तालुक्यातील सर्वांगीण भरीव विकासाच्या आधारावर अनुराधाताई नागवडे याच २०२४ च्या आमदार असणार असल्याच्या भावना देखील कार्यकर्त्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!