श्रीगोंदा विधानसभेसाठी चौरंगी लढत! आमदारकी साठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात..!

अनुराधा नागवडे, विक्रमसिंह पाचपुते अण्णासाहेब शेलार, राहुल जगताप हे दिग्गज निवडणूक रिंगणात आमने-सामने..!

श्रीगोंदा, ता. ४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक कार्यक्रम दि. १५/१०/२०२४ रोजी मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडून जाहीर करणेत आलेला आहे. त्या अनुषंगाने दि. २२ ऑक्टोबर २०२४ ते २९ ऑक्टोबर २०२४ पर्यत नामनिर्देशन पत्र घेण्यात आली. त्यामध्ये ३६ उमेदवारांचे एकूण ५४ अर्ज प्राप्त झाले. दि. ३०/१०/२०२४ रोजी छाननी केली असता त्यामध्ये ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविणेत आले. छानणीअंती एकूण ३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर आज दि.४/११/२०२४ रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यत १५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आज अखेर १६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

सदरनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे चिन्ह वाटप करणेत आले.
उमेदवाराचे नाव,पक्षाचे नाव व चिन्ह

१) अनुराधा राजेंद्र नागवडे
शिवसेना (उदधव बाळासाहेब ठाकरे )
मशाल
२) पाचपुते विक्रम बबनराव
भारतीय जनता पार्टी
कमळ
३) अॅड महेंद्र दादासाहेब शिंदे
बहुजन समाज पार्टी
हत्ती
४) संजय हनुमंत शेळके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
रेल्वे इंजीन
५) आण्णासाहेब सीताराम शेलार
वंचित बहुजन आघाडी
गॅस सीलेंडर
६) आळेकर गोरख दशरथ
जनहित लोकशाही पार्टी
हिरा
७) दादा बबन कचरे
राष्ट्रीय समाज पक्ष
शिटटी
८) विनोद साहेबराव साळवे
सैनिक समाज पार्टी
ट्रम्पेट
९) डॉ. अनिल काशीनाथ कोकाटे.
अपक्ष
चिमणी
१०) जगताप राहुल कुंडलिकराव
अपक्ष
रोड रोलर
११) दत्तात्रय आप्पा वाघमोडे
अपक्ष,ऑटो रिक्शा
१२) नवशाद मुन्सीलाल शेख
अपक्ष,किटली
१३) रत्नमाला शिवाजी ठुबे
अपक्ष,ऊस शेतकरी
१४) राहुल संजय छत्तीसे
अपक्ष,खाट
१५) सागर रत्तन कासार
अपक्ष,वाळूचे घडयाळ
१६) सुवर्णा सचिन पाचपुते
अपक्ष,प्रेशर कुकर

वरील प्रमाणे १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सदर उमेदवारांची आज बैठक घेऊन मा. निवडणूक निर्णय अधिकारी २२६ श्रीगोंदा मतदार संघ यांनी दैनंदिन खर्च सादर करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. तसेच आचार संहितेबाबत काटेकोरपणे पालन करणेबाबत देखील सुचना देण्यात आलेल्या आहेत. सदर बैठकीस सहायक खर्च निरीक्षक देखील उपस्थित होते. त्यांनी देखील उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनीधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचे शंकाचे निरसन केले तसेच उमेदवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकावयाची असेल किंवा वृत्तपत्रातील जाहिराती, बातम्या बाबतची पूर्व परवानगी जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समीतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच आचार संहीता भंग केलेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करणेबाबत आदेश संबंधीतांना देणेत आले असलेबाबत माहिती दिली.

२२६ श्रीगोंदा मतदार संघामध्ये एकूण ३,३९,५२६ मतदार असून एकूण मतदान केंद्र ३४५ आहेत. तसेच ८५ वरील वयोगटाच्या मतदारांना व दिव्यांग अशा एकूण ३०७ मतदारांना गृह मतदान करणेकामी यंत्रणा सज्ज करणेत आलेली आहे. २२६, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी दि. २०/११/२०२४ रोजी आपले मतदान करुन मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मा. निवडणूक निर्णय
अधिकारी, २२६, श्रीगोंदा मतदार संघ यांनी सर्व मतदारांना यानिमीत्ताने केलेले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.3 ° C
21.3 °
21.3 °
95 %
8kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
27 °
Wed
29 °
error: Content is protected !!