दिवाळी निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌वतीने श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप!

संघटनेचे कार्य महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात आदी राज्यात सुरू असून २७ हजाराहून अधिकचे सभासद असलेली ही एकमेव सघटना आहे!

श्रीगोंदा, ता. ५ : महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सभासद संख्या असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या शुभहस्ते श्रीगोंदा येथील पत्रकारांना दिवाळी सणानिमित्त मिठाई व भेटवस्तूचे वाटप करुन पत्रकारांची दिवाळी गोड केली

यावेळी नुकत्याच संपन्न झालेल्या दिक्षाभुमी ते मंत्रालय पत्रकार सवांद यात्रेच्या पुस्तिकेचे प्रकाशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे संपादक असलेल्या समर्थ गावकरी या वृत्तपत्राचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी डॉ आरोटे यांनी बोलताना म्हणाले की, सरकारी व्यवस्था कोणत्याही घटकाला न्याय देताना मतांच्या गाठ्याचा विचार करत असेल तर पत्रकार हा देखील एक मतांचा गठ्ठा असुन त्यांच्या मागण्याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवे असे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या अथवा पक्षाच्या भूमिका विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार व वृत्तपत्र ही माध्यमे अत्यंत आवश्यक असतात मात्र निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी या माध्यमाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे पत्रकारांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्ष तशाच प्रलंबित आहेत या सर्व बाबींचा विचार करत मार्गदर्शक संजयराव भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात आदी राज्यात सुरू असून २७ हजाराहून अधिकचे सभासद असलेली एकमेव सघटना असून संघटनेच्या वतीने नुकतीच लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने देखील यांची त्वरित दखल घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली हे नक्कीच आपले यश असून आगामी काळात देखील संघटना पत्रकारांच्या हितासाठी असलेल्या इतर सर्व मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेणार असल्याचे सांगत. या विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात पत्रकारांच्या मागणीचा उल्लेख करुन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिला तर पत्रकार सदैव त्याचा सोबत राहील असे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत उपस्थित सर्व पत्रकारांना व त्यांच्या परिवाराला मिठाई व भेटवस्तु देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, जिल्हा सरचिटणीस सुरेश खोसे, ऍड सोमनाथ गोपाळे,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष माधव बनसुडे, सचिव डॉ. अमोल झेंडे,दादासाहेब सोनवणे,उपाध्यक्ष मेजर भिमराव उल्हारे, नंदकुमार कुरूमकर, ज्ञानेश्वर येवले, सल्लागार सतिष ओहोळ, खजिनदार किशोर मचे, मिडिया अध्यक्ष अनिल तुपे, सहसचिव सोहेल शेख,संघटक अमर घोडके, कार्याध्यक्ष शफिक हवालदार, शहराध्यक्ष नितीन रोही,शहरउपाध्यक्ष सचिन शिंदे इले.मि.तालुकाउपाधयक्ष जावेद इनामदार, मार्गदर्शक श्रीरंग साळवे, वैभव हराळ, धनेश गुगळे,डॉ.शिवाजी पवळ, पंकज गणवीर,चंदन घोडके,राजु शेख,पीटर रणसिंग, पल्लवी शेलार यांच्या सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिष ओहोळ सर यांनी तर प्रास्ताविक किशोर मचे यांनी केले.तालुका सचिव डॉ.अमोल झेंडे यांनी आभार व्यक्त केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
36.4 ° C
36.4 °
36.4 °
15 %
4.9kmh
4 %
Fri
36 °
Sat
38 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
40 °
error: Content is protected !!