टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१६ सप्टेंबर २०२२ : गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी उप नगराध्यक्षपदाच्या झालेल्या निवडीत सौ. ज्यातीताई सुधीर खेडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत नगरसेवक राजाभाऊ लोखंडे आणि सौ दिपालीताई औटी यांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु ऐनवेळी त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सौ खेडकर यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर सुधाकर भोसले यांनी काम पाहिले. त्यांना नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सहाय्य केले.
उपनगराध्यक्ष पदाची जागा यापुर्वीचे उपनगराध्यक्ष संग्राम घोडके यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाली होती. सौ. ज्यातीताई सुधीर खेडकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि भांडाऱ्याची उधळण करून आनंद साजरा केला. त्यांचे अभिनंदन माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते, पोलीस उपअधीक्षक खेडकर अहमदनगर, नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, नगरसेवक यांनी केले. व नागरिकांनी आणि समर्थकांनी गुलाल भंडारा उधळून यावेळी अभिनंदन करून आनंद साजरा केले.
स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)