श्रीगोंदा, ता. ६ : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उबाठा)पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार सौ.अनुराधाताई राजेंद्र नागवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा. तालुक्यातील वांगदरी येथील अंबिका माता मंदिर प्रांगणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, काष्टीचे सरपंच व शिवसेना उपनेते साजन पाचपुते व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिली.
महाविकास आघाडी ला राज्यात आणि मतदार संघात अनुकूल वातावरण असून महाविकास आघाडी उमेदवार सौ.अनुराधा नागवडे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करत साजन पाचपुते यांनी प्रचाराच्या शुभारंभास महा विकास आघाडीतील जिल्ह्यातील व तालुक्यातील घटक पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाबासाहेब भोस, साजन पाचपुते व प्रशांत दरेकर यांनी केले आहे