विधानसभा निवडणूक पूर्वी तालुक्याच्या विकासाचा व्हिजन आराखडा तयार..! जन आशीर्वाद यात्रेतून सौ.अनुराधाताई नागवडेंना गावोगावी उदंड प्रतिसाद..!

लोकप्रतिनिधींनी फक्त मतांचा वापर केला कुठलेही असे भरीव विकास काम झालेले नाही सामान्य जनतेने अशा व्यथा मांडल्या!

श्रीगोंदा, ता ७ : महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांची नगर -श्रीगोंदा २२६ मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेदरम्यान नागवडे यांचे गावोगावी जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त गावोगावी सव नागवडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान सौ अनुराधाताई नागवडे यांनी विधानसभा निवडणूक पूर्वी तालुक्याच्या विकासाचे व्हिजन आराखडा तयार ठेवला आहे.

या आयोजित जन आशीर्वाद गावोगावी भेटी दरम्यान नगर श्रीगोंदा मतदार संघात गेल्या चाळीस वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींनी सत्ता उपभोगूनही अनेक समस्या आजही कायम असल्याचे ग्रामस्थांनी सौ नागवडे यांना बोलवून दाखवले. त्यामध्ये चिंचोडी पाटील गटामध्ये सिंचनाची गेल्या चाळीस वर्षात सोय न झाल्याने हा गट अद्यापही सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. मग या चिंचोडी पाटील गटामध्ये नेमका विकास कोणता साधला गेला? असा सवाल देखील तेथील शेतकरी व मतदारांमधून बोलले जात आहे. मुळातच श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांचा वारसा लाभलेले नागवडे कुटुंबातील नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; महाविकास आघाडीचा उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे; युवा नेते दीपक शेठ नागवडे व नागवडे परिवारातील सर्व सदस्य हे नगर श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येक गावोगावी जाऊन शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेतल्या यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधींनी फक्त मतांचा वापर केला कुठलेही असे भरीव विकास काम झालेले नाही अशा भावना देखील उपस्थित नागरिकांनी सौ नागवडे यांच्यापुढे मांडल्या.

या नगर- श्रीगोंदा मतदारसंघात भेटीदरम्यान अनेक कष्टकरी शेतकऱ्यांनी सौ अनुराधाताई नागवडे यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिल्यानंतर पाच वर्षानंतरच त्यांचे कुटुंबातील सदस्य भेटले. अशा संसप्त प्रतिक्रिया देखील सौ नागवडे यांना उपस्थित नागरिकांनी मांडल्या. ज्याप्रमाणे श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी पूर्वपदावर आणले. त्याच धरतीवर आमच्या चिंचोडी पाटील गटातील दुर्लक्षित गावांचा विकास सहकार महर्षी बापूंचा वारसा लाभलेल्या सौ अनुराधाताई नागवडे तुम्हीच करू शकता कारण नागवडे कुटुंबाकडे विकासाचे व्हिजन आहे. नागवडे कुटुंब हे शब्दाला जागणारे असल्याने या दुर्लक्षित गटाचा विकास नागवडे कुटुंबाचा सदस्यच विधानसभेत मांडू शकतो. यावेळी कोणीही आमच्या पुढे मतांचा जोगवा मागितला तर योग्य उत्तर देऊन सौ नागवडे ताई तुमच्या पाठीशी आम्ही ठाम राहू; अशा भावना देखील चिंचोडी पाटील गटातील कार्यकर्ते व नागरिकांनी यावेळी मांडल्या.

यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांनी भेटीदरम्यान विधानसभेत तुमच्या हक्काचा आमदार म्हणून आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला आम्ही कदापिही तडा जाऊ देणार नाही. चिंचोडी पाटील गटच नव्हे तर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचे विकासाचे व्हिजन आम्ही तयार ठेवले आहे. ज्या पद्धतीने सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी समाजकारण डोळ्यासमोर ठेवून श्रीगोंदा तालुक्याचा काया पालट केला बापूंचे विचार संस्कृती व त्यांचे तालुक्याच्या विकासात आधुरे राहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. प्रामुख्याने सहकार; सिंचन; शिक्षण; आणि कृषी क्षेत्रात भरीव असे योगदान दिले. बापूंचेच विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही नागवडे कुटुंब सदैव समाजसेवेसाठी तत्पर आहोत.

सहकार महर्षी बापूंनी सत्ते शिवाय तालुका सुजलाम सुजलाम केला. कोणाच्याही आतापर्यंत अन्नामध्ये नागवडे कुटुंबांनी खोडा घातला नाही. अशी आठवण देखील सौ नागवडे यांनी भेटीदरम्यान नागरिकांना दिली. याउलट प्रत्येक सर्वसामान्यांच्या संकटकाळी नागवडे कुटुंब हे मदतीसाठी अग्रेसर आहे. कष्टकरी; कामगार; शेतकरी; ऊस उत्पादक यांना सहकाराच्या माध्यमातून वेळोवेळी न्याय देण्याची भूमिका घेतली. असे सांगून सौ नागवडे पुढे म्हणाल्या की; मतदारांनी कुठल्याही भूलथापाला बळी न पडता येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हावर बटन दाबून आपले बहुमोल मत देऊन विधानसभेत सर्वसामान्यांच्या हिताचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी द्या; निश्चितच संधीचे सोने केल्याशिवाय नागवडे कुटुंब स्वस्त बसणार नाही. अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांनी यावेळी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नागरिकांना दिली. या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सौ नागवडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने निश्चितच आमदार म्हणून सौ नागवडे ह्याच विधानसभेत जातील अशी खात्री देखील जन आशीर्वाद यात्रेनिमित्त नगर श्रीगोंदा मतदारसंघात मतदारांकडून मिळत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
68 %
10.2kmh
100 %
Tue
26 °
Wed
26 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °
error: Content is protected !!