शिवसेना सामान्य माणसांच्या त्यागातून निर्माण झाली आहे ‘फटे लेकिन हटे नही’.. त्यांनी मागे ईडी लावली तुरुंगात टाकले परंतु भाजपमध्ये गेलो नाही शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष नाही स्वाभिमानी लोकांचा पक्ष आहे – खा. संजय राऊत
श्रीगोंदा, ता. ७ : नागवडे कुटुंबाने या दुष्काळी तालुक्याला सर्वांगीण विकासाच्या पूर्वपदावर आणले सहकार, शिक्षण,सिंचन, कृषी क्षेत्र आदी क्षेत्रात नेत्रदीपक काम केले. मग नागवडे कुटुंबातील आमदार का नको? अनुराधाताईंना एकदा संधी द्या, आमदार काय असतो हे दाखवून देऊ असे प्रतिपादन संजय राऊत यांनी वांगदरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचार शुभारंभ सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी शशिकांत गाडे सर होते यावेळी मंचकावर जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, उपनेते साजन पाचपुते व प्रमुख पदाधिकारी होते.
एक वर्षापूर्वी सांगितले होते साजन तुला श्रीगोंद्यात लढायचं आहे तेव्हा तयारी नव्हती परंतु शिवसेनेत लोक असेच असतात आधी उमेदवारी नंतर तयारी आम्ही मोठे नेते नाहीत फक्त शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या पुंण्याई मुळे साध्या कार्यकर्त्याला ही मोठे मोठे पदे दिले पान टपरी वर बसणाऱ्याला आमदार केले कोंबडी चोराला मुख्यमंत्री केले रिक्षा चालवणाऱ्याला मंत्री केले आमच्याकडे कारखाने वाले नव्हते आता दोन आले आहेत. सामान्य शिवसैनिक यांच्या ताकदीवर १८ खासदार आहेत तर ४५ वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहोत ही शिवसेना सामान्य माणसांच्या त्यागातून निर्माण झाली आहे फटे लेकिन हटे नही त्यांनी मागे ईडी लावली तुरुंगात टाकले परंतु भाजपमध्ये गेलो नाही शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष नाही स्वाभिमानी लोकांचा पक्ष आहे. ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेत त्यांना शेतकरी गावात जाऊ देत नाहीत अशी टिका ही राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांचे राजकारण राहुल जगताप करत आहेत स्वार्थापोटी पवार साहेबांचा फोटो बॅनर वर वापरता मग त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचाही फोटो लावावा.. असे फोटो लावून मत मिळत नाही पवार साहेब अनुराधाताई यांच्या पाठीमागे आहेत त्यामुळे आमदार म्हणून अनुराधाताईच निवडून येणार शिवसेनेला अशा रणरागिणींची गरज आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवण्याची ताकद महिलांमध्ये होती. पुढील पंचवीस वर्षे महाविकास आघाडी हटणार नाही आणि कमळाबाईला फुलू देणार नाही असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
सभेचे सूत्रसंचालन नागवडे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले.यावेळी मंचकावर जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सुनंदा पाचपुते, सीमा गोरे, सुनिता शिंदे,उपनेते साजन पाचपुते, दीपकशेठ नागवडे, शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे, विठ्ठलराव नागवडे, सुरेश लोखंडे, संतोष इथापे, विजय शेंडे, सतीश मखरे, जयंत वाघ,आबासाहेब कोल्हटकर, प्रशांत गोरे, एम.डी शिंदे, यांच्यासह श्रीगोंदा – नगर मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.