श्रीगोंदा – अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील पारगाव, मढेवडगाव, शिरसगाव बोडखा, बाबुर्डी, म्हातार पिंपरी, वांगदरी, ढोकराई, मुंढेकरवाडी, लिंपणगाव या गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला – सुवर्णा पाचपुते
श्रीगोंदा, ता. १० : सुवर्णा पाचपुते यांनी गावसंवाद दौरा श्रीगोंदा – अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील पारगाव, मढेवडगाव, शिरसगाव बोडखा, बाबुर्डी, म्हातार पिंपरी, वांगदरी, ढोकराई, मुंढेकरवाडी, लिंपणगाव या गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या प्रत्येक गावातील लोक स्वागत करून मतदाना मधून पाठबळ देऊ असा विश्वास व्यक्त करत आहेत. लोकांमधून आता बदलाची अपेक्षा लोक बोलून दाखवत आहेत.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव संवाद दौऱ्याची सुरुवात केली आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन थेट जनतेशी संवाद साधत आहे, आणि त्यांच्याकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. या दौऱ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे यावेळी श्रीगोंद्यात घराणेशाहीला पूर्णविराम मिळेल, अशी खात्री निर्माण झाली आहे. गावकरी मंडळीही प्रखरपणे घराणेशाहीला विरोध करत आपले मत मांडत आहेत, आणि यावेळी ती मोडीत निघणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत आहेत.
या परिवर्तनाच्या प्रवासात श्रीगोंद्याच्या जनतेच्या भावनांचा आदर ठेवून सर्वांना विनंती केली येत्या २० तारखेला ‘प्रेशर कुकर’ चिन्हासमोरील बटण दाबून, मोठ्या बहुमताने विजय मिळवून देण्यास हातभार लावा. हा विजय श्रीगोंद्याच्या नव्या युगाची सुरुवात असेल, घराणेशाहीला आव्हान देणारा आणि जनतेच्या मनात नवा विश्वास निर्माण करणारा असेल असा विश्वास सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केला.