श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला आता खऱ्या अर्थाने विकास हवा आहे. संवादाच्या माध्यमातून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवण्याचे आश्वासन दिले – सुवर्णा पाचपुते
श्रीगोंदा, ता. १० : २२६ श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघांमधील सुवर्णा पाचपुते अपक्ष उमेदवार आहेत त्यांना लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीगोंद्याच्या भविष्यातील या आमदार सामान्यांच्या कामाच्या असतील त्यामुळे मतदारांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी आहे मतदार संघातील सखोल माहिती असलेल्या या उमेदवार भविष्यात श्रीगोंद्याचा विकास करतील असा जनमतात विश्वास व्यक्त होत आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घोडेगाव, आढळगाव, भावडी, कोकणगाव, हिरडगाव, चांडगाव, टाकळी कडेवळीत, पेडगाव आणि अजनुज या गावांमध्ये संवाद दौरा करत असताना जनतेचा जो भरभरून पाठिंबा मिळतोय, त्यातून हे स्पष्ट होतं की श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला आता खऱ्या अर्थाने विकास हवा आहे. संवादाच्या माध्यमातून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली, आणि मूलभूत सुविधांचा अभाव, तसेच स्थानिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला.
गावकऱ्यांनी नव्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. श्रीगोंदा तालुका बदल आणि प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज आहे. या परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या हक्काचे मतदान करून विकासाची नवी दिशा निश्चित करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान रूपी साथ द्यावी, तुमचा प्रत्येक मत विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरेल असे आवाहन सुवर्णा पाचपुते यांनी संवाद दौऱ्यावर मध्ये जनतेस केले.