गौरी शुगर जिल्ह्यात नंबर एकचा भाव देणार – चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील

चालू वर्षी गाळप हंगामात दहा लाख मे टन उसाचे गाळप करुन अहिल्यानगर जिल्ह्यात नंबर एकचा भाव देणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांनी हिरडगाव येथे बोलताना दिली..!

श्रीगोंदा, ता. ११ : गौरी शुगर साखर कारखान्याला रिफायनरी सिस्टीम आहे त्यामुळे चांगल्या दर्जाची साखर तयार करता येते या गाळप हंगामात दहा लाख मे टन उसाचे गाळप करुन अहिल्यानगर जिल्ह्यात नंबर एकचा भाव देणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांनी हिरडगाव येथे बोलताना दिली. गौरी शुगरचा सोमवारी गाळप हंगाम शुभारंभ बाबुराव बोत्रेपाटील व रेखा बोत्रेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

बाबुराव बोत्रेपाटील पुढे म्हणाले की आ. बबनराव पाचपुते यांनी चांगल्या भावनेने हिरडगाव फाट्यावर साखर कारखाना उभा केला होता पण अपयश आले आजही ते कारखान्याशी फोन  करतात उसाला जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे यावर चर्चा करतात. चांगले गाळप करुन शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्त भाव  कामगारांना वेळेवर पगार हे गौरी शुगर चा मुख्य उद्देश आहे गेल्या गाळप हंगामात ऊसाला ३००६ रु प्रतिटन भाव दिला दिवाळीला शेतकऱ्यांना ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर दिली. शेतकऱ्यांनी गौरी शुगरला चांगला ऊस घालावा गौरी शुगरची टीम शेतकऱ्यांना पुर्ण सहकार्य करणार आहे असेही  बाबुराव बोत्रेपाटील म्हणाले. यावेळी मिलिंद दरेकर, संतोष दरेकर, आत्माराम फराटे यांची भाषणे झाली.

यावेळी संपतराव दरेकर, मारुती औटी, बाळासाहेब घोलप, भाऊ औटी, सचीन चौधरी, रामदास दरेकर, बाळासाहेब वाळके, उपस्थित होते प्रास्ताविक व्यवस्थापक रोहिदास यादव यांनी केले तर आभार नवनाथ देवकर यांनी मानले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.7 ° C
24.7 °
24.7 °
74 %
6.9kmh
100 %
Wed
29 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
23 °
Sun
25 °
error: Content is protected !!