‘आमदार होणार शेतकऱ्याची लेक’ अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांच्या या वाक्याची जनतेत सकारात्मक चर्चा..!

सुवर्णाताईंची संघर्ष कथा ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्याचा पहिला टप्पा त्या जिंकल्या आहेत असं म्हणावे लगेल..!

श्रीगोंदा, ता. ११ : श्रीगोंदा – नगर मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुक प्रचाराचे वातावरण हळू हळू चांगलीच रंगत धरू लागले आहे प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून मतदारांना आकर्षित करत आहे अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी बॅनर वर लिहिलेल्या ‘आमदार होणार शेतकऱ्याची लेक’ या वाक्याची मतदारांमधून सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.

शेतकरी कुटुंबातील कन्या सुवर्ण पाचपुते यांना शेतकऱ्यांच्या लहान मोठ्या प्रश्नांची जाण असून त्या ते सोडवण्याचे आश्वासन मतदारांना देत आहेत. ठिकठिकाणी गाव संवाद करत असताना त्या आपल्या जीवनातील संघर्ष बोलूनही दाखवत आहेत त्यामुळे सुवर्णाताईंची संघर्ष कथा ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्याचा पहिला टप्पा त्या जिंकल्या आहेत असं म्हणावे लगेल.

ना कारखाना ना शिक्षण संस्था आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत प्रेशर कुकर या चिन्ह समोरील बटन दाबून विजयी करण्याचे मतदारांना त्या आवाहन करत आहेत.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
scattered clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
74 %
6.5kmh
33 %
Sun
26 °
Mon
34 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
35 °
error: Content is protected !!