श्रीगोंदा विधासभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार सौ.अनुराधाताई नागवडे या एकलव्य संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याची खंत तालुका अध्यक्ष जंबु अलवट यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
श्रीगोंदा, ता. १२ : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. प्रत्येक उमेदवार कार्यकर्ते आणि सामान्य लोकांना जोडत आहे मात्र राज्यभर भिल्ल आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे शिवाजीराव ढवळे संस्थापक अध्यक्ष असलेल्या एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य व महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा यांची महाराष्ट्रात युती असतानाही श्रीगोंदा विधासभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार सौ.अनुराधाताई राजेंद्र नागवडे या एकलव्य संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याची खंत तालुका अध्यक्ष जंबु अलवट यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
मात्र जर कोणी बेगडी आम्ही संघटनेचे पदाधिकारी आहोत असे सांगुन आपल्या बरोबर फिरत असतील तर ते लक्षात असावे आणि जर आम्हा प्रमुख व अधिकृत पदाधिकारी यांना विचारात घेतले नाही तर आम्ही आमच्या संघटनेचे मतदार मतदानाचा हक्क बजावणार पण तो पर्याय नोटा असेल म्हणजे नोटा समोरील बटन दाबून मतदानाचा हक्क बजावणार आहोत.
साविस्तर बोलतांना जिल्हाध्यक्ष गिताराम बर्डे म्हणाले इतर राज्यां प्रमाणे राज्यात आदिवासी बजेट कायदा लागु करावा, आदिवासी आरक्षणाला बाधा येऊ नये, सर्व आदिवासींचे शासकिय अतिक्रमण कायम करावे हे प्रमुख विषय घेऊन एकलव्य संघटनेची शिवसेना उबाठा पक्षाबरोबर युती केली आहे या विषयावर येथील उमेदवाराने बोलले पाहिजे अन्यथा ठाम निर्णय घ्यावा लागेल असं ते म्हणाले.
यावेळी एकलव्य संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गिताराम बर्डे, जिल्हा सचिव सोमनाथ गोरे, जिल्हा उपाध्यक्ष विजय सुर्यवंशी, अंकुश गायकवाड, तालुकाअध्यक्ष जंबो आलोट, सतिष गोरे, दिलीप संसारे, भानुदास बर्डे व विशाल घोडके हे प्रमुख व अधिकृत पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
श्रीगोंदा नगर मतदारसंघात एकलव्य संघटनेच्या ४४ शाखा असुन १४२०० पेक्षा जास्त मतदान आहे. त्यामुळे श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या लढतीत हे मतदार निर्णायक असतील – जंबु अलवट तालुकाअध्यक्ष एकलव्य संघटना श्रीगोंदा.