श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरी : जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस शोध घेत असलेले आरोपी श्रीगोंद्यात अटकेत

मविआच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ १४ नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात..!

श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले आहे.

श्रीगोंदा, ता. १२ : महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची गुरुवार ता १४ रोजी दुपारी १२ वाजता श्रीगोंदा येथील संत महंमद महाराज मंदिर पटांगणामध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी दिली.

श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या वतीने सौ. अनुराधा नागवडे या मशाल चिन्हावर निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचारासाठी गुरुवारी १४ रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा श्रीगोंदा येथे शेख महंमद महाराज मंदिर पटांगणामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेकरिता राष्ट्रवादीच्या खासदार फौजीया खान, मराठा मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष सुभान अली खान, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले  आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
23.7 ° C
23.7 °
23.7 °
79 %
6kmh
62 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
error: Content is protected !!
WhatsApp Group