श्रीगोंदा – नगर मतदार संघात आपल्याला मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय असून, यंदा परिवर्तन होणे अटळ आहे – सुवर्णा पाचपुते
श्रीगोंदा, ता. १२ : श्रीगोंदा – नगर मतदारसंघात गाव संवाद दौऱ्यामध्ये निमगाव खलु, कौठा, आर्वी, अनगरे, गार, सांगवी दु. चोराचीवाडी, वेळू, चिखलठाण वाडी, कणसेवाडी, आनंदवाडी या गावांमध्ये अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी उपस्थित नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी नागरिकांशी संवाद साधून आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. आपल्या मतदार संघात आपल्याला मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय असून, यंदा परिवर्तन होणे अटळ आहे असं त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या जनतेने घराणेशाही विरुद्ध प्रखर भूमिका घेतली आहे, ज्यामुळे घराणेशाहीला नक्कीच पूर्णविराम मिळेल, अशी खात्री वाटते. गावकरी मंडळी एकजूट होऊन परिवर्तनाच्या दिशेने पाऊल उचलत आहेत, आणि यावेळी श्रीगोंदा घराणेशाहीच्या विळख्यातून मुक्त होईल, हे निश्चित आहे असे गावकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळते.
श्रीगोंदा – अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील दौऱ्यांतून जो उत्साह व पाठिंबा गावागावांतून मिळतो आहे, तो परिवर्तनाच्या दिशेने चाललेले पाऊल ठरत आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक महिला व ग्रामस्थांमध्ये असलेली बदलाची आस स्पष्ट दिसत आहे. आज आपण एकत्र येऊन आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, मुलभूत सुविधांच्या विस्तारासाठी आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज आहे. हा केवळ निवडणुकीचा लढा नसून, आपल्या गावांचा, आपल्या भावी पिढ्यांचा आणि आपल्या एकूणच समाजाचा विकास करण्याची लढाई आहे असं सुवर्णा पाचपुते गाव संवाद दौऱ्यावर असताना म्हणाल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवा वर्ग उपस्थित होते.
येत्या २० तारखेला अनुक्रमांक १६ प्रेशर कुकर या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती केली.