श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक मा.डी रत्ना मॅडम यांनी प्रशिक्षणार्थी यांना निवडणूक कामकाजाबाबत केल्या सूचना!

मतदान कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे आयोजन..!

श्रीगोंदा, ता. १३ : आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले होते.सदर प्रशिक्षणास २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक मा.डी रत्ना मॅडम यांनी भेट दिली.यावेळी निरीक्षक मॅडम यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना निवडणूक कामकाजाबाबत *You should be systematic* हा दृष्टिकोन ठेऊन काम करावे ही सूचना केली.

मा.निवडणूक आयोगाने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नये. प्रत्येक निवडणुक ही वेगळी असते त्यामुळे सर्वांनी हँडसऑन ट्रेनिंग तसेच प्रशिक्षणातील सर्व बाबीची काळजीपूर्वक माहिती घ्यावी अशी सूचना केली.

या प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी शिर्डी मा.श्री.कोळेकर आणि अरुण कटाळे कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर यांनीही भेट दिली. यावेळी मा. कोळेकर साहेब यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी कराव्या लागणाऱ्या सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांनी टीम म्हणून काम करावे आणि मतदानाच्या दिवशी आवश्यक असणारे सर्व महत्त्वाचे नमुने यामध्ये नमुना १७ क, नमुना १७ अ, केंद्राध्यक्ष दैनंदिनी व्यवस्थित भरावी. मतदान केंद्रावर प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान पथकातील सर्वांनी सर्व निवडणूक कामकाज समजून घेऊन केल्यास सर्व अधिकारी कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थितपणे पार पाडली जाते.

यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन मधील सर्व बारीक-सारीक गोष्टींची इत्यंभूत माहिती सांगितली आणि ईव्हीएम मशीन मध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी २२६ श्रीगोंदा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन १५ मा. गौरी सावंत तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार श्रीगोंदा डॉ.क्षितिजा वाघमारे, परिविक्षाधीन तहसीलदार प्रवीण मुदगुल, निवडणूक नायब तहसीलदार पंकज नेवसे उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
82 %
7.9kmh
100 %
Mon
23 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
28 °
Fri
30 °
error: Content is protected !!