उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ दि. १६ रोजी महंमद महाराज पटांगण श्रीगोंदा येथे दुपारी २ वाजता वंचित व ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत भव्य सभेचे आयोजन!
श्रीगोंदा, ता.१५ : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघा मधील होत असलेल्या चौरंगी लढतीचे महत्वाचे समजले जाणारे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब सिताराम शेलार यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, प्रा.लक्ष्मण हाके सर, प्रा. नवनाथआबा वाघमारे, मुस्लिम नेता तय्यब जाफर, ॲड. राज्यप्रवक्ता वंचित बहुजन आघाडी अरुण जाधव, लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांची शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी संत महंमद महाराज पटांगण श्रीगोंदा येथे दुपारी २ वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार आणि वंचितचे प्रदेश प्रवक्ते, ॲड अरुण जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आण्णासाहेब शेलार यांनी सांगितले की दुर्लक्षित, कष्टकरी, शेतकरी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. या आधी केलेल्या कामाच्या आधारावर व निवडणूकांचा असलेला अनुभवाच्या जोरावर मी निवडणूक रिंगणात यशस्वी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव यांनी जरांगे फॅक्टरवर बोलताना सांगितले की जरांगे हे येथील राजकारण्यांनी उभा केलेला शरद पवार यांचा बागुलबुवा आहेत प्रस्थापित लोकांना मदत करण्यासाठी जरांगे यांची भूमिका आहे अशी टिका त्यांनी यावेळी केली
या पत्रकार परिषदेस अण्णासाहेब शेलार, अरुण जाधव, संतोष भोसले, ओंकार शिंदे यांच्या सह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी त्यांनी १६ तारखेला होत असलेल्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.