विद्यमान आमदारांच्या पत्नीने त्यांच्या मुलासाठी उमेदवारी बदलली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का झाली नाही – सुवर्णा पाचपुते
श्रीगोंदा, ता. १५ : अनेक वर्षांपासून भाजप पक्षाची एकनिष्ठ असलेल्या सुवर्णा पाचपुते भाजपने केलेल्या निलंबनाबद्दल म्हणाल्या दहा वर्षापासून पक्षाचे ऐकले तरीही पक्षाने मला बेदखल केले आज मी लोकांचे ऐकले आहे फिक्स उमेदवार, मनातील उमेदवार म्हणून लोकांनी मला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्याची मुलगी म्हणून मी मतदारांपर्यंत पोहोचत आहे. लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे प्रस्थापितांच्या विरोधात आज लोक उभे आहेत त्यांना विश्वासाने काम करणारा उमेदवार निवडून द्यायचा आहे म्हणून लोक आज माझ्या पाठीशी आहेत असं सुवर्णा पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या विद्यमान आमदारांच्या पत्नीने त्यांच्या मुलासाठी उमेदवारी बदलली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी केला. जोपर्यंत मी पक्षाचे ऐकत होते तोपर्यंत पक्षाने माझी दखल घेतली नाही आज मी समाजाचे ऐकले तर पक्षाने मला निलंबित केले आहे. परंतु लोक मतपेटीतून उत्तर नक्कीच देतील असा मला विश्वास आहे
तरुण वर्ग,सर्वसामान्य शेतकरी आज जागा झाला आहे निवडणूक आली की तेच तेच उमेदवार त्यांच्याकडे आजपर्यंत स्टिकर बदलून येत होते परंतु आज मी शेतकऱ्याची मुलगी त्यांच्यासमोर जात आहे त्यामुळे तरुण वर्ग, महिला आणि शेतकरी यांना माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि मी त्या आमदार होऊन पूर्ण करेल असा विश्वास सुवर्णा पाचपुते यांनी मतदारांना दिला.