एका बाजूला तीन कारखानदार आहेत तर दुसऱ्या बाजूला सामान्य शेतकरी कुटुंबातील आमचे उमेदवार अण्णासाहेब शेलार आहेत – प्रकाश आंबेडकर
श्रीगोंदा, ता. १६ : अण्णासाहेब शेलार यांना वंचितची उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे, एका बाजूला तीन कारखानदार आहेत तर दुसऱ्या बाजूला सामान्य शेतकरी कुटुंबातील आमचे उमेदवार आहेत. मी काढलेल्या माहितीनुसार अण्णासाहेब जिंकलेले आहेत असे आजच सांगतो तुम्ही हा शब्द खरा करून दाखवा. अण्णासाहेब शेलारांना आमदार करा कारखान्यांनी बुडवलेले उसाचे पैसे सरकारमार्फत घरी पोहोच करतो. श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघा मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ दि. १६ रोजी श्रीगोंदा बाजार तळ येथे झालेल्या सभेमध्ये वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलत होते.
समोरील तीनही उमेदवार कोट्यावधींचे मालक आहेत हा पैसा भ्रष्टाचार करून त्यांनी गोळा केला आहे तो जनतेचा पैसा आहे. मराठ्यांचे दोन भाग पडतात एक निजामी मराठा आणि दुसरा रयतेतला मराठा सत्तेमध्ये आहेत ते निजामी मराठे आहेत ते श्रीमंत,लुटारू आणि कपटी आहेत गुण्यागोविंदाने चाल्लेला महाराष्ट्राचा हा गाडा निजामी मराठ्यांकडून बिघडवण्याचे काम चालू आहे अशी टीका आंबेडकर यांनी केली. बबनराव पाचपुते व मी चांगले मित्र होतो परंतु त्यांनी निवडलेला रस्ता हा भ्रष्टाचाराचा आहे आणि माझा फुले शाहू आंबेडकर विचारांचा आहे.
त्याकाळी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला ते म्हणाले होते ज्यांच्यासाठी मी भांडलो त्यांच्यासाठी काही करता येत नसेल तर माझा काय उपयोग आरक्षणामुळे गोरगरिबांना सत्तेत स्थान मिळाले. आज आरक्षण धोक्यात आले आहे कोर्टाचा ५०% चा आदेश आहे त्यामध्ये २७% ओबीसी आरक्षण आहे. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत स्थगिती दिली आहे तर भाजपचा जात निहाय जनगणना करण्यास विरोध आहे. अण्णासाहेब शेलार जर विधानसभेत गेले तर आरक्षणाचा मुद्दा हाणून पाडता येणार आहे. जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यात येणार आहे. या सभे मध्ये त्यांनी शेलारांना मतदान करण्याचे आवाहन उपस्थित जनसमुदयाला केले.
आज झालेल्या सभेमध्ये अपक्ष उमेदवार गोरख आळेकर, भटके विमुक्त नेते बापू माने, यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांना जाहीर पाठिंबा दिला.
या सभेवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार, सुरेखा पुणेकर, अरुण जाधव, तय्यब जफर, दिपक बोराडे, नवनाथ वाघमारे, कांतीलाल कोथिंबीरे, संतोष जंजाळ, बापू माने, सोमनाथ धाडगे, रामभाऊ चितळकर, प्रा.ज्ञानदेव गवते, ऋषिकेश शेलार, गोरख आळेकर यांनी आपले मनोगते व्यक्त केली.