शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुनश्च एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान करून शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करणार – बाळासाहेब दुतारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख
श्रीगोंदा, ता. १७ : तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करून प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुनश्च एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान करून शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे असा निश्चय सर्व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अहिल्यानगर दक्षिण बाळासाहेब दुतारे हरिभाऊ काळे, संभाजी घोडके, सुरेश देशमुख, रोहिदास मस्के, योगेश भुतकर, प्रवीण काळे, संतोष चिकलठाणे, दादाराम मस्के, भाऊसाहेब गोरे, शाकाल शोले, मयूर चव्हाण, महादेव ठोमस्कर, नुतन पानसरे, राजू तोरडे, ओमकार शिंदे, मयूर गोरे, सोमनाथ धोत्रे, बल्ली हेंद्रे आदींसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.