अण्णासाहेब शेलार यांनी टाकलेला डाव विरोधकांना धडकी भरवणारा; वंचितने बदलले बाकी उमेदवारांचे विजयाचे गणित..!

निवडणुकीचे अंतिम चित्र काय असणार लवकरच स्पष्ट होईल परंतु वंचितचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्यामुळे ही चौरंगी लढत रंगतदार व चूर्शीची होणार हे मात्र तितकेच खरे आहे!

श्रीगोंदा, ता. १८ : श्रीगोंदा – नगर विधानसभेच्या निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे दि. १६. रोजी झालेल्या वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमध्ये जमलेला मोठा बहुजन समाज शेलार यांना विजयाच्या समीप घेऊन जाणार हे चित्र स्पष्ट होताना दिसत होते. अण्णासाहेब शेलार यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर जो डाव टाकला आहे तो विरोधकांना धडकी भरवणारा आहे त्यामुळे त्यांच्या विजयाचे गणित नक्कीच बदलणार आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे.

अण्णासाहेब शेलार यांनी मागील अनेक वर्षांपासून बबनराव पाचपुते यांचे काम केले तरी पाचपुते यांनी शेलार यांना उमेदवारीसाठी पाठिंबा दिला नाही पिढ्यानपिढ्या तुमचेच काम करायचे का? असा सवाल ही त्यांनी सभे मध्ये केला त्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सर्वसामान्य बहुजन जनतेच्या जीवावर उमेदवारी करत आहे. येत्या २० तारखेला या तीनही पैलवानांना चितपट करणार असा विश्वास शेलार यांनी बोलून दाखवला.

सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अण्णासाहेब शेलार यांनी गेली अनेक वर्षापासून काम केले आहे सर्वसामान्य जनतेने पाठिंबा दिल्यामुळे त्या जनतेची मागणी होती की तुम्ही उमेदवारी करा अशी मागणी असल्यामुळे शेलार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गोरगरीब जनतेचा विश्वासघात करायचा नव्हता म्हणून निवडणुकीतून माघार नघेता शेलार ठाम राहिले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वस्व पनाला लावलेले आमचे कुटुंब आहे उद्या जर काही बरं वाईट झालं निकाल वेगळा लागला तर पुन्हा कधी या कारखानदारांच्या विरोधात सर्वसामान्य उभा राहण्याची हिंमत करणार नाही साहेबांनी जाहीर केले आहे ही त्यांची शेवटची निवडणूक आहे आम्ही सर्वस्व पणाला लावून ही निवडणूक लढत आहोत त्यामुळे आपण पाठीशी उभे राहावे असे आवाहन ऋषिकेश शेलार यांनी जनतेला केले त्या आवाहनाला उपस्थित जनसमुदायाने दाद दिली.

येणाऱ्या २३ तारखेला कोण विजयी होणार हे कळणारच आहे परंतु श्रीगोंदा मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी होत असलेली ही चौरंगी लढत तीन बलाढ्या मातब्बर उमेदवारांसमोर एक शेतकरी कुटुंबातील उमेदवार यांच्यात होत आहे. निवडणुकीचे अंतिम चित्र काय असणार लवकरच स्पष्ट होईल परंतु ही चौरंगी लढत रंगतदार व चूर्शीची होणार हे मात्र तितकेच खरे आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!