सध्याचे आमदार म्हणजे बोलाची कडी बोलाचाच भात? सीनाधरण जलपूजन कार्यक्रमात आ. राम शिंदे यांचे वक्तव्य!

टीम लोकक्रांती : आष्टी/कर्जत प्रतिनिधी : दि.१७ सप्टेंबर २०२२ : सिना मध्यम प्रकल्प म्हणजे काय? त्यासाठी काय करावे लागले? त्याचा इतिहास काय आहे ? हे न पाहता आम्ही केलेल्या कामाचे बटन दाबले म्हणजे ते काम आम्हीच केले असे म्हणणा-यांचे तसेच पाचपाच ठिकाणी जलपूजन चाललंय.. त्यांचं वाईट वाटते म्हणत आ.सुरेश धस यांनी नाव न घेता विरोधकांवर टिका केली. पाच पाच ठिकाणी जलपुजन करुन मीच केले,मीच केले म्हणणे हे हास्यास्पद असल्याची बोचरी टिका आ.सुरेश धस यांनी केली.

  • सिनाधरण जलपूजन कार्यक्रमात आमदार सुरेश धस हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आ.प्रा.राम शिंदे होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेअरमन आनंदराव गांगर्डे होते.यावेळी आ.धस पुढे बोलताना म्हणाले की, मी आमदार असताना ९७ टक्के काम पूर्णत्वास नेले होते. त्यानंतर ३ टक्के काम आ. प्रा.राम शिंदे यांनी पूर्ण केले.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी औरंगाबाद येथे मराठवाडाच्या हक्काच्या पाण्यासाठी बैठक बोलावली होती.त्यावेळेच जलसंपदा मंत्री अजित पवार यांना भेट घेऊन सीना मेहकरी प्रकल्प तसेच रखडलेला भोसेखिंड मार्ग यासाठी पहिल्या वर्षी १२ कोटी मंजूर केले.तेथून पुढे ही योजना सुरु झाली आणि माझ्या काळात ९७ टक्के या योजनेचे काम झाले होते.तरीही आम्ही कधीही नारळ फोडायचा कार्यक्रम केला नाही.कुठंच पाण्याचे जलपूजन केले नाही.कधीच दिंडोरा पिटवयाचे काम कधीच केले नाही.विरोधक मात्र आत्ता पाच-पाच ठिकाणी जलपूजन आणि नारळ फोडण्याचे काम करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.जस काही मीच सगळं केले असे म्हणत नाव न घेता विरोधकांवर आ.धस यांनी टिका केली.

    यावेळी बोलताना आ.प्रा.राम शिंदे म्हणाले की,सीना प्रकल्प कुकडीच्या पाण्याने भरला आहे.हे धरण वरदान आहे.विरोधक म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात आहे.या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी मागील काळात आम्ही काम केले आहे अशी टीका करीत आ.शिंदे म्हणाले की,मागच्या तीन वर्षात एक तरी काम झालं का ? शेवटी अपेक्षा ही आपल्याच माणसाकडून केली जाते.

मंत्रीपद मिळाल्याने संधीच सोनं करून मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. ग्रामस्थांनी जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे मी दिले.शेवटी काम करायचं तर श्रद्धेने करायचं. सध्याचे आमदार म्हणजे बोलाची कडी बोलाचाच भात असल्याचे शिंदे म्हणाले सगळ्याना अनुभूती आली आहे. ज्या अडचणी आहेत्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला असेही शेवटी आ.प्रा.राम शिंदे यांनी टीका केली.

यावेळी बीड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजयदादा आजबे,माजी सभापती रमजान तांबोळी,माजी उपसभापती गौतम आजबे,पं.स.सदस्य बाबासाहेब गांगर्डे,सरपंच भागचंद पांडुळे, एकनाथ गांगर्डे,सरपंच मंगेश गांगर्डे,उपसरपंच तानाजी अनभुले, चेअरमन लहु गांगर्डे, व्हा.चेअरमन रामभाऊ कर्डिले,राजेंद्र शिंदे,कृष्णा काकडे,दिपक खिळे,अशोक परकाळे,
सतिष जगदाळे,संदीप करंजकर,विठ्ठल गलांडे,चेअरमन युनुस शेख भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(प्रवीण पोकळे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!