दि. २० रोजी मतदारांनी आपल्या मौल्यवान मतदानाचा हक्क बजवावा असे प्रशासनातर्फे सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे – गौरी सावंत

२२६, श्रीगोंदा, विधानसभा मतदार संघ जि. अहिल्यानगर मध्ये पुरुष १,७६,३६५ व स्त्री १,६३,१५९ इतर २ असे एकूण ३,३९,५२६ इतके मतदार आहेत. सदर मतदारांना मतदान करणेकामी एकूण ३४५ मतदान केंद्राची उभारणी करणेत आलेली आहे.

श्रीगोंदा, ता. १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ निवडणुक कार्यक्रम दि. १५/१०/२०२४ रोजी मा.भारत निवडणुक आयोग यांचेकडून जाहीर करणेत आलेला आहे. त्या अनुषंगाने २२६, श्रीगोंदा, विधानसभा मतदार संघ जि. अहिल्यानगर मध्ये पुरुष १,७६,३६५ व स्त्री १,६३,१५९ इतर २ असे एकूण ३,३९,५२६ इतके मतदार आहेत. सदर मतदारांना मतदान करणेकामी एकूण ३४५ मतदान केंद्राची उभारणी करणेत आलेली आहे. सदर मतदान केंद्रावर एकूण २०७० कर्मचारी हे मतदान घडविणेकामी कामकाज पाहणेसाठी कार्यरत करणेत आलेली आहेत. त्यापैकी सेक्टर ३७ व ४ राखीव आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सदर कर्मचारी यांना श्रीगोंदा येथून मतदान केंद्रावर जाणेसाठी एकूण ४१ एसटी बसेस ची व्यवस्था करणेत आलेली आहे. तसेच १३ मीनीबस १५ क्रुझर ई. वाहनांची सोय करणेत आलेली आहे. २२६, श्रीगोंदा विधानसभा निवडणुक २०२४ साठी निश्चीत केलेल्या एकूण मतदार केंद्राच्या ५०% मतदान केंद्राचे वेब कास्टींग करणेबाबत मा. भारत निवडणुक आयोगाच्या सुचना आहेत. त्याप्रमाणे एकूण ३४५ मतदान केंद्रापैकी १७३ मतदान केंद्राचे वेब कास्टींग करणेत येणार आहे. २२६, श्रीगोंदा विधानसभा निवडणुक २०२४ साठी मतदान केंद्रावर जाणे अशक्य असलेल्या ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले मतदार, बेंच मार्क डिसएबीलीटी (४०% पेक्षा जास्त दिव्यांग असलेले) दिव्यांग मतदारांचे वरील सर्वांचे मतदान दि. १४/१५/१६/ नोव्हेंबर २०२४ दरम्यान गृह मतदान प्रक्रिया पुर्ण झाली असून एकूण ३०७ मतदारांपैकी २९५ मतदारांचे (८५+ २५० व दिव्यांग ४५) मतदान यशस्वी रित्या पार पडले आहे.

निवडणूक सेवेतील जे कर्मचारी मतदानाच्या दिवशी निवडणूक कामावर हजर असतील अशा अधिकारी कर्मचारी यांना टपाली मतपत्रीकेची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. एकूण २९२० कर्मचारी यांना
टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सर्व मतदान केंद्रावर मा. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सर्व मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांगासाठी व वृध्दांसाठी रॅम्प मतदारांना पिण्यासाठी पाणी, प्राथमीक उपचार संच, मतदारांची जास्त गर्दी झाल्यास त्यांना बसण्यासाठी व्यवस्था ई. सुविधा पुरविणेत आलेली आहे.

मतदानाच्या दिवशीच्या ४८ तास आगोदर प्रचार बंद करणेत आला असून आचारसंहिता कक्ष कर्मचारी व इतर टीम यांनी पुर्ण क्षमतेने व काटेकोरपणे आचार संहितेचे पालन होते किंवा नाही यांसाठी सर्व मतदार संघात दक्षता पथकाची पेट्रोलींग सुरु केले आहे.

२२६, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात दि. २० / ११ / २०२४ रोजी होणारे मतदान निःपक्षपातीपणे निर्भीड वातावरणात २२६, श्रीगोंदा विधानसभा निवडणुक २०२४ साठी सर्व मतदारांनी दि. २० / ११ / २०२४ रोजी आपले मतदान असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेचे दरम्यान हजर राहून आपल्या मौल्यवान मतदानाचा हक्क बजवावा. असे प्रशासनातर्फे सर्व मतदारांना आवाहन करणेत येत आहे. २२६, श्रीगोंदा विधानसभा निवडणुक २०२४ साठी मतमोजणी दि. २३ / ११ / २०२४ रोजी शासकीय धान्य गोदाम पेडगाव रोड श्रीगोंदा येथे सकाळी ८.०० वाजेपासून करणेत येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत व तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!