सर्व गोष्टींचे योग्य नियोजन करण्यात आले असून मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे.
श्रीगोंदा, ता. २२ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या चौरंगी लढतीमध्ये कोण होणार आमदार याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तर काही तासांमध्ये ही प्रतीक्षा संपणार आहे २२६ – श्रीगोंदा विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ३ लाख ३९ हजार ५२६ मतदारांपैकी २ लाख ५० हजार ७३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणी उद्या दि. २३ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून करण्यात येणार आहे तरी मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीनसाठी १४ टेबल तर पोस्टल मतदानाचे मतदान मोजण्यासाठी ११ टेबल अशी रचना करण्यात आलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.क्षितिजा वाघमारे, सहाय्यक नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी विशेष मेहनत घेऊन मतमोजणी प्रक्रियेसाठी योग्य नियोजन केले आहे.
मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर अंतरावर पादचारी रेषेची आखणी करण्यात आलेली आहे. मतमोजणी ही शासकीय धान्य गोदाम, पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे होणार आहे व याचा चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी सेक्युरीटी म्हणून सीआरपीएफ, महाराष्ट्र पोलीस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व गोष्टींचे योग्य नियोजन करण्यात आले असून मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करतील.