श्रीगोंदा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विक्रम बबनराव पाचपुते यांचा ३७ हजार १५६ मतांनी विजय..!
श्रीगोंदा, ता. २३ : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रम बबनराव पाचपुते यांना ९९८२० मते मिळाली. चौरंगी झालेल्या लढतीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनुराधा राजेंद्र नागवडे, वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब सीताराम शेलार व अपक्ष उमेदवार राहुल कुंडलिकराव जगताप हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते या निवडणुकीत विक्रम बबनराव पाचपुते यांचा ३७१५६ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी जाहीर केले.
२२६ श्रीगोंदा विधानसभा निवडणूकी मध्ये उमेदवारांना मिळालेली मते
१) अनुराधा राजेंद्र नागवडे – ५४१५१
२) पाचपुते विक्रम बबनराव – ९९८२०
३) ॲड. महेंद्र दादासाहेब शिंदे – ८०९
४) संजय हनुमंत शेळके – १०८४
५)अण्णासाहेब सीताराम शेलार – २८०७०
६) आळेकर गोरख दशरथ – ४७४
७) दादा बबन कचरे – २८९
८) विनोद साहेबराव साळवे – ५०६
९) डॉ. अनिल काशिनाथ कोकाटे – ६२९
१०) जगताप राहुल कुंडलिकराव – ६२६६४
११) दत्तात्रय आप्पा वाघमोडे – ४११
१२) नौशाद मुंशीलाल शेख – ३५९
१३) रत्नमाला शिवाजी ठुबे – ३९५
१४) राहुल संजय छत्तीसे – ४२४
१५) सागर रतन कासार – ४४७
१६) सुवर्णा सचिन पाचपुते – १७२५
नोटा – १०३३
वरील प्रकारे सर्व उमेदवारांना मिळालेली मते असून सर्वाधिक ९९८२० मते मिळवून पाचपुते विक्रम बबनराव यांनी ३७१५६ मताधिक्याने विजय प्राप्त केला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी जाहीर केले. या कामी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.क्षितिजा वाघमारे, सहाय्यक नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी विशेष मेहनत घेऊन मतमोजणी प्रक्रियेसाठी योग्य नियोजन केले. पोलीस निरीक्षक किरणकुमार शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.