रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात, प्रियदर्शनीताई निकाळजे व मुख्य प्रवक्ते मराठी मुस्लीम चळवळ, दंगामुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्यक्ष शेख सुभानअली यांच्या हस्ते समाज प्रबोधनकार रावसाहेब घोडके यांना ‘संविधान रक्षक पुरस्कार’ प्रदान
श्रीगोंदा, ता. २९ : संविधान सन्मान सोहळा २०२४ वर्ष ४ थे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सम्यक संविधान ग्लोबल फाऊंडेशन दौंड यांच्या संयुक्त विद्यामानाने या वर्षीच्या संविधान सन्मान सोहळा दिनाच्या अनुषंगाने देण्यात येणारा “संविधान रक्षक पुरस्कार ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांचा मार्गदर्शना खाली प्रियदर्शनीताई निकाळजे व मुख्य प्रवक्ते मराठी मुस्लीम चळवळ, दंगामुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्यक्ष शेख सुभानअली यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभेचे श्रीगोंदा तालुका संघटक व संविधान जनजागृती प्रचारक श्रीगोंदा तालुका समन्वयक रावसाहेब हरिभाऊ घोडके यांना जिल्हास्तरीय “संविधान रक्षक पुरस्कार” देवून दौंड येथे सन्मानित करण्यात आले.
सायकलवर फिरून पर्यवरण संवर्धना बरोबर संविधान जनजागृती तसेच महापुरुष यांचे समतेचे विचार समाजात रुजवत अनेक वर्ष त्यांचे हे कार्य अविरत चालू आहे. पाटबंधारे विभागात ३७ वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरीतून निवृत्त झाल्यावर घोडके यांनी जनजागृतीचे समाज कार्य हाती घेतले.
या कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)दौंड तालुका अध्यक्ष आनंद ओहोळ, शहराध्यक्ष शशांक गायकवाड, युवक अध्यक्ष पवन थोरात, संघटक अनिकेत सवाणे तसेच दौंड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व योगदानाने कार्यक्रम पार पाडला.
भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुका शाखा सर्व पदाधिकारी तसेच उपासक उपासिका, श्रामणेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार यांच्या कडून घोडके यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच सर्वच स्तरामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.