बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार यांच्याकडून शेतीविषयक उपक्रम राबवणाऱ्या कृषीकन्यांचे स्वागत!
श्रीगोंदा, ता. २७ : घारगाव (श्रीगोंदा) येथील साईकृपा कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्यांचे बेलवंडी या गावामध्ये सरपंच ऋषिकेश शेलार यांनी स्वागत केले. शेतीविषयक माहिती येथील शेतकऱ्यांना त्या देणार आहेत यामध्ये कृषिकन्या प्रतिक्षा भैलुमे ,अंकिता गाडेकर, शिवानी जगताप, श्रद्धा मांढरे यांचा सहभाग आहे.
पुढील दोन महिने ह्या कृषिकन्या बेलवंडी गावात उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडवण्याच्या प्रयत्न करणार आहेत तसेच गावात वेगवेगळे शेतीविषयक उपक्रम घेणार आहेत.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच ऋषिकेश शेलार व इतर कर्मचारी तसेच साईकृपा कृषि महाविद्यालयातील कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एस.बंडगर, प्रा. आर. व्ही. घोडके आणि प्राचार्य डॉ. के. एच. निंबाळकर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.