सरकार सत्तेत येताच शेत तिथे रस्त्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार – शरद पवळे

अर्ज केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ६० दिवसात शेत रस्ता मिळावा या संदरर्भात शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन उभारणार- महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवणीचे शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील

श्रीगोंदा, ता. १ : शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असुन दळणवळणासाठी शेतीला शेतीपूरक व्यवसायासाठी दर्जेदार शेत रस्त्याची गरज आहे महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकार सत्तेत येताच शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष संपवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसारमाध्यमांला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

तुकडेवारीसह विभाजनानंतर शेतरस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकरी शेतात वास्तव्यास असल्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध,अपंग यांची शेतरस्त्यांअभावी मोठी रोजची जीवघेणी कसरत होताना दिसत आहे शेतरस्त्यांच्या समस्येमुळे फौजदारी स्वरूपांच्या घटना दिवसेंदिवस घडताना निदर्शनात येत आहे एका बाजूला निसर्गही शेतकऱ्यांची परीक्षा घेत असून शेतमाला हमीभाव मिळत नाही त्याचबरोबर शेतरस्त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज बनवण्यापासून प्रशासकीय कार्यालय ते न्यायालयीन लढा जीव घेणा बनला आहे त्याच्या पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत यामध्ये अनेकांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या आहेत.

मोठ्या कष्टाने पिक उभे करायचे आणि त्याला रस्त्या अभावी बाजारात घेऊन जाता येत नसेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय यासाठी पुन्हा नव्याने येणाऱ्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकार सत्तेत येताच शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष संपवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी सांगितले.

चौकट
शेतकरी समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध शेतीला दळणवळणासाठी ब्रिटिशकालीन शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित होऊन नंबरींचे सर्वेक्षण होऊन त्याला दंड चालू व्हावेत,वहिवाटीच्या शेतरस्त्यांचे सर्वेक्षण होऊन त्यांना गाव नकाशावर घेण्यात यावे शासण निर्णयाप्रमाणे शेतरस्त्यासाठी मोजणी शुल्क व संरक्षण फी लावू नये अर्ज केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ६० दिवसात शेत रस्ता मिळावा यासदरर्भात शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन उभारणार- महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवणीचे शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील.

चौकट
महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपच्या घटना वाढत चालल्या असुन भावाभावात, शेतकऱ्यांमध्ये आपापसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणार अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्‍याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट् राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी सांगितले

माहिती उगम – (प्रसिद्धीपत्रक)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.3 ° C
38.3 °
38.3 °
9 %
6.8kmh
2 %
Thu
38 °
Fri
37 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
39 °
error: Content is protected !!