श्रीगोंदा तहसीलदार यांच्या एकतर्फी आदेशाने मिशनरी संस्थेचा हक्क हिरावला, दोषीवर कार्यवाहीची मागणी..!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रसिद्धीस दिलेल्या कामांचा लेखाजोखा या वृत्तानंतर तालुक्यातील सरकारी कामांच्या लेखाजोख्यातून अनागोंदी कारभार चव्हाट्यावर..!

श्रीगोंदा, ता. ६ : श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे, मंडलाधिकारी अनिल कुंदेकर व तलाठी चाकणे यांच्या संगणमताने क्र कावि आरटीएस १४१५/ २०२४  दि. २७ सप्टेंबर २०२४ चा काढलेला एकतर्फी आदेश हा द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेचे हक्क हिरावणारा असून सदर प्रकरण सुनावणी दरम्यान ही संस्था गट नंबर १७४९ नुसार सातबारा उताऱ्यावर भोगावटादार असताना कसलेही नोटीस न देता किंवा या मिशनरी संस्थेला  विचारात न घेता केला गेला असल्याने या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांची सखोल चौकशी आणि कार्यवाही करण्याची मागणी या संस्थेचे चेअरमन सुजित जाधव आणि सेक्रेटरी पास्टर डॉ. आर .व्ही गायकवाड यांनी केली आहे.

माध्यमांना संबोधित करताना या अनागोंदी महाघोटाळा कारभाराबद्दल माहिती देताना ते म्हणाले, सामनेवाले यांचा अर्ज दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीगोंदा तहसील दप्तरी दाखल असताना सदर प्रकरण दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मंडळाधिकारी श्रीगोंदा यांना या अर्जाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करावा या आशयाचा टिपणीने पाठवण्यात आले.सदर प्रकरणात चौकशी दरम्यान मंडलाधिकारी अनिल कुंदेकर यांनी अर्जाचे सोबत जोडलेल्या कागदपत्राचे अवलोकन करताना सामनेवाली यांचा जबाब नोंदवून कार्यवाही चालू असताना भालेराव सतीश डॅनियल यांनी दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी हरकत घेतली होती पण दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी सदर हरकत रद्द करणे कामे अर्ज देण्यात आला यावर संदिग्नता असुन या अर्जावरून मंडल अधिकारी यांनी दि.२४ एप्रिल २०२४  रोजी जबाब घेऊन त्यासोबत अर्जदाराचा जबाब घेऊन सविस्तर अहवाल श्रीगोंदा तहसीलदार यांना सादर केला.

या अर्जाची सविस्तर चौकशी करण्याबाबतचा स्पष्ट शेरा असताना आणि गट नंबर १७४९ नुसार या २८.१२ हेक्टर क्षेत्रावर संस्थेचा ताबा आहे, वहिवाट आहे त्या ठिकाणी चर्च ,मिशनरी मुलींचे वसतिगृह, विद्यालय,कर्मचारी वसाहत आहे व हे वास्तव असताना मंडलाधिकारी यांनी आम्हाला नोटीस न देता किंवा प्राप्त परिस्थितीचे अवलोकन न करता चौकशी अहवाल सादर केला आणि त्याची शहानिशा न करता तहसीलदार श्रीगोंदा यांनी आदेश पारित केला यामुळे आमच्या हक्काची पायमल्ली करण्यात आली.

पुढील घटनाक्रम असा की या प्रकरणात आदेश पारित झाल्यावर श्रीगोंदा तलाठी संदीप चाकणे यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी ३२६७७, फेर नंबर प्रमाणे नोंद केली असून मंडलाधिकारी यांनी १९ ऑक्टोबर २०२४ ला सदर नोंद कायम करून ७/१२,८अ  वर दि इंडियन कॅनडियन प्रेस ब्रिटेरियन मिशन ऑफ मॉडरेटर दिपक नामदेव गायकवाड याप्रमाणे बदल करण्यात आला. याबाबत सुद्धा हितसंबंधितांना नोटीस बजावली तारीख ०५ ऑक्टोबर २०२४ नोंद निर्गत दि.१९ ऑक्टोबर २०२४ प्रमाणे रेखांकित असून त्यावेळी सुद्धा संस्थेचे म्हणणे विचारात घेतले नाही किंवा कळवले नाही याबाबत तलाठी चाकणे यांना अर्जाद्वारे विचारणा केली असता त्यांनी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी लेखी कळविले असता सदर माहिती चावडी वर ऑनलाईन स्थळावर प्रसिद्ध नमूद केली असल्याचे कळविले असून आम्हाला सूचित केलेले नाही त्यामुळे या प्रकरणात संस्थेला जाणून-बुजून अंधारात ठेवण्यात आले .आणि दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी दुय्यमक निबंधक कार्यालय श्रीगोंदा यांच्याकडे स ग द ७४८२/२०२४ झोन नं.१/७२नुसार पुढील खरेदीखताचा दस्त नोंदवण्यात आला.

हे प्रकरण कायमच वादग्रस्त आणि आमच्यावर अन्यायग्रस्त असल्याचे कळाल्यावर या आशियाची तक्रार निवेदने वरिष्ठ पातळीवर सादर करताना उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा यांचे कोर्टात आर टी एस नंबर ४२२/२०२४ प्रमाणे अपील दाखल असून दिनांक २६ नोव्हेंबर २०२४  रोजी श्रीगोंदा तहसीलदार आदेश रद्द ठरवने कामी पुढील कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

एकंदरीत सर्व वादग्रस्त आणि अनागोंदी घडामोडीमध्ये आमच्या मिशनरी संस्थेचा हक्क हीरावला असून आमच्या जंगम, मालमत्तेची विक्री करुन अमर्याद नुकसान करण्याचा सामनेवालाचा मुख्य हेतू असून यामध्ये तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी आणि व्यवहार करणारे सर्वच दोषी सामील आहेत त्याबाबतची सखोल चौकशी आणि कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकट १
वरील प्रकरण महाराष्ट्र महसूल जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम नियम १५५ मधील तरतुदी नुसार निगडित असून या प्रकरणाचा आदेश मंडलाधिकारी अनिल कुंदेकर यांचे चौकशी अहवालानुसार पारित करण्यात आला आहे त्यामध्ये भोगावटादार मिशनरी संस्थेवर अन्याय झाला असेल किंवा अर्जदारांनी चुकीची माहिती सादर केली असेल तर न्यायालयीन प्रक्रियेतून खरेदीदस्त रद्द होऊ शकतो. किंवा या प्रकरणाचा चुकीचा  चौकशी अहवाल सादर केला असेल तर अहवाल सादर करणारे जबाबदार असतील –  क्षितिजा वाघमारे, तहसीलदार श्रीगोंदा

चौकट २
सदर अर्ज प्रकरणाप्रमाणे सोबत जोडलेल्या कागदपत्राच्या आधारावर आणि अर्जदार आणि त्यामध्ये तक्रारदार यांचा जबाब नोंदवून या प्रकरणी चावडी ऑनलाईन प्रणालीवर माहिती प्रसारित करूनच सविस्तर अहवाल पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आला आहे आणि  वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात आली आहे – अनिल कुंदेकर, मंडलाधिकारी श्रीगोंदा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!