विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ससाणे नगर, सिद्धार्थ नगर तसेच साई सेवा ब्लड ग्रुप अहमदनगर, एच.डी.एफ.सी.बँक श्रीगोंदा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीगोंदा, ता. ६ : श्रीगोंदा शहरामध्ये महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ससाणे नगर, सिद्धार्थ नगर तसेच साई सेवा ब्लड ग्रुप अहमदनगर, एच.डी.एफ.सी.बँक श्रीगोंदा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाच्या ८० बाटल्या संकलित झाल्या तर जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थ नगर मधील मुला मुलींचे रक्त गट तपासण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जिवा घोडके,संदिप उमाप,आनंद घोडके,संग्राम घोडके,शिवा घोडके,हृदय घोडके,गोरख घोडके,नंदकुमार ससाणे,प्रदीप घोडके,श्रीकांत घोडके,सागर सोनवणे,विशाल घोडके, लक्ष्मण घोडके यांनी केले.
यावेळी रक्तदानाच्या ८० बाटल्या संकलित झाल्या तर जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थ नगर मधील मुला मुलींचे रक्त गट तपासण्यात आले. महापरिनिर्वान दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रपठण व अभिवादन ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ११.४५ वाजता व ६ डिसेंबर सकाळी ९ वाजता करण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली रक्तदान करून देणे हा या रक्तदान कार्यक्रमाचा उद्देश आहे. रक्ता अभावी कोणाही बांधवांचा जीव जाऊ नये तसेच रक्ताचा जो तूटवडा भासत आहे तो भरून निघू शकेल. रक्तदान सर्वत्र आवश्यक असून त्यासाठी रक्तदात्यानी पुढे येणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमासाठी संदिप मोटे सर,रावसाहेब घोडके,शिंदे सर,चंदन घोडके, रेश्मा घोडके,सूरज घोडके, आतिफ शेख,युवराज घोडके,सचिन घोडके गोरख आळेकर,परशू घोडके,तृषाल ससाणे,अमर घोडके,घोडके सर,वागस्कर सर,बापू माने,भारतीय बौद्ध महासभा,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती,बौद्ध धम्म यात्रा समिती,ससाणे नगर सिद्धार्थ नगर मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
माहिती उगम – आयोजित कार्यक्रम