डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
श्रीगोंदा, ता. ६ : येथील महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य रवीशेठ दंडनाईक, प्राचार्य दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
“महापरिनिर्वाण” हा शब्द बौद्ध तत्त्वज्ञानातून उलगडला गेला आहे जो मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या निर्वाण स्थितीचे प्रतिनिधित्व करतो. बौद्ध धर्मात, महापरिनिर्वाण ही मृत्यू, दुःख आणि जन्मापासून मुक्तीची अंतिम अवस्था आहे. शब्द. “परिनिर्वाण” बुद्धाच्या प्रस्थानाचे वर्णन करते. डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना सांगताना विद्यालयाचे इंग्रजी अध्यापक बापू जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या चष्म्यातून न पाहता समग्र देशासाठी कार्य करणार अष्टपैलू व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले महापुरुष या भूमिकेतून पाहिले पाहिजे या शब्दात अभिवादन केले.
यावेळी इ. ६ वी अ मधील प्रतिक क्षीरसागर,समर्थ राऊत,अरबाज शेख,आयान शेख,शेखर मखरे आपल्या मनोगतातून अभिवादन केले. सुमित जेधे याने डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर स्वरचित कवितेचे गायन केले.यश उदमले,वेदांत निसळ यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून दाखवला.
या कार्यक्रमाचे नियोजन सिमा जगताप व माधुरी सरोदे तसेच इ.६ वी अ विद्यार्थी यांनी केले.
माहिती उगम – (आयोजित कार्यक्रम )